डॉ.रजनी लुंगसे लिखित ' संत गाडगे महाराज : वैचारिक व सांस्कृतिकतेचे अधिष्ठान ' पुस्तकाचे प्रकाशन
आधुनिक केसरी न्यूज
निफाड :- खांदेशातील अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिक येथील राष्ट्रीय महिला समाज रत्न प्रा.डाॅ.रजनी लुंगसे लिखित "संत गाडगे महाराज : वैचारिक व सांस्कृतिकतेचे अधिष्ठान" या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
ग्रंथ लेखनाच्या अंतर्भागात संत गाडगेबाबांच्या जीवन प्रवासापासून तर त्यांच्या वैचारिक व सांस्कृतिक कार्याची नोंद घेतलेली आहे. महान पथदर्शक भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील संशोधनात दिसलेली साधर्म्यता, संत कबीर, संत तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संत गाडगेबाबांच्या विचारांवर असलेला प्रभाव यामध्ये नोंदविलेला आहे. संत गाडगे महाराज हे आगळ्या वेगळ्या कीर्तन शैलीचे कीर्तनकार तसेच पत्र वाङ्ममयाचे उत्कृष्ट पत्र लेखकही होते याची नोंद या ग्रंथात मिळते. नाशिक येथील ज्ञानसिंधु प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. या शिवायही त्यांची चरित्र ग्रंथ वैचारिक तसेच काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे. लेखिका प्रताप महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्याच महाविद्यालयात त्यांच्या मुलत्वाच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. प्रकाशनसाठी मान्यवर डॉ.श्री. वि. दा. पिंगळे,(कार्यवाह, म .सा.प पुणे) प्राचार्य श्री.तानसेन जगताप, प्रा. डॉ.दिलीप भावसार, मिलिंद कुढे, नकुल लुंगसे, डॉ.प्रभाकर जोशी, गोकुळ बागुल, सुभाष वाणी आदी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List