आजचे चर्चेतील ट्विट : लोकशाही, भावपूर्ण श्रद्धांजली! वाचा सविस्तर.....

आजचे चर्चेतील ट्विट : लोकशाही, भावपूर्ण श्रद्धांजली! वाचा सविस्तर.....

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई  : काल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा  निकाल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरा शिवसेना पक्ष आहे, असा निकाल  दिला.  मात्र दोन्ही गटातील एकही आमदार अपात्र ठरला नाही. नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांना  पात्र ठरवले आहे. . ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.
संजय  राऊतांच्या ट्विटमध्ये नेमक काय?
संजय राऊत यांनी एक ट्विट करत एक फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या फोटोत एक काळ्या रंगाचा बोर्ड दिसतो. या बोर्डवर भावपूर्ण श्रद्धांजली, असे लिहिलेले आहे. ‘लोकशाही’ लिहिलेल्या फोटोला हार घालण्यात आला आहे. 1950- 2023. शोकाकूल – महाराष्ट्र, असा हा बोर्ड आहे. हा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

IMG_20240111_131751

कालचा निकाल मॅच फिक्सिंग.....
काल विधानसभा अध्यक्षांनी  दिलेल्या निकालावरही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. ते म्हणाले काल देण्यात आलेला निकाल हा मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. काल नार्वेकर यांनी मॅच फिक्सिंग करून निकाल दिला आहे. या निकालाने लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केले आहे. भरत गोगावले प्रतोद म्हणून निवड चुकीची आहे, असे संजय राऊत म्हणाले.
हा परिवारवाद नाहीत का?
पुढे संजय राऊत यांनी म्हंटले की,  शिवसेना आणि काँग्रेसवर परिवारवादा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्याला आता राऊतांनी उत्तर दिले आहे. आमच्यावर टीका करता मग एकनाथ शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना राजकारणात का आणले? तुम्ही तुमच्या मुलासाठी लांडगे नावाच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली. मुलगा श्रीकांत यांच्यासाठी तिकीट मागितले. हा परिवारवाद नाहीत का?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी