दीड वर्षांनंतर हर्सूल कारागृहाला झाली फरार कैद्यांची आठवण
पेरोलवर सुटून फरार झालेल्या तिघांविरोधात विरोधात गुन्हे दाखल
आधुनिक केसरी न्यूज
औरंगाबाद - कोरोना काळात हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून दीड महिन्याकरता पेरोलवर सुटलेल्या एक मंहिला व दोन पुरुष गुन्हेगारांच्या विरोधात जिनसी आणि क्रांतिचौक पोलीस ठाण्यात हर्सूल कारागृह प्रशासनाने दीड वर्षांनंतर फरार असल्याचे गुन्हे दाखल केले आहेत
खमरुनिसा बेगम शेख हसन (४२) व मोहम्मद शेख रफिक कादरी (२३) दोघेही रा. दलालवाडी तर तिसरा मनोहर कोंडीबा वाघमारे (२९) रा. कट्कटगेट अशी फरार गुन्हेगाराची नावे आहेत वरील तिन्हीही बंद्यांना मार्च ते मे २०२१ या काळात पेरोलवर सुटून पुन्हा कारागृहात हजर राहण्याचे आदेश बजावले होते पण कारागृहांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कैदी बाहेर मजा मारत असल्याचे सुदैवाने कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले व रडत पडत गुन्हे दाखल झाले पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी व क्रांतिचौक पोलीस करत आहेत
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List