आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!

आ.देवतळे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न

आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!

आधुनिक केसरी न्यूज 

वरोडा : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही ठराविक माध्यमांतून आमदार करण देवतळे यांच्या ताडोबा सफारी संदर्भात जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य वेगळेच असून विरोधकांचा हा राजकीय स्टंट पूर्णपणे उघडा पडला आहे.

जानेवारी महिन्यात आमदार करण देवतळे हे आपल्या पत्नीसह ताडोबा येथे 30 जानेवारीला ताडोबाच्या बफर क्षेत्रातील निमडेला गेट मार्गे जंगल पर्यटनासाठी गेले होते. या खासगी सहलीदरम्यान त्यांनी काही घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. वनविभागाच्या नियमांनुसार तांत्रिक त्रुटी आढळताच एका जबाबदार लोकप्रतिनिधीची भूमिका बजावत आमदार महोदयांनी तात्काळ दंड भरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.  "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे मानणाऱ्या आमदार साहेबांनी कोणत्याही वादात न पडता वनविभागाच्या नियमांचा आदर राखला आणि स्वतःहून दंडाची रक्कम भरून हे प्रकरण जानेवारीतच पूर्ण केले होते."

 मात्र या घटनेचा सध्या प्रसारित केला जाणारा व्हिडिओ हा आताचा नसून जानेवारी महिन्यातील असून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सध्या आमदार करण देवतळे हे २२ मार्चपासून केरळ राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या कामाच्या धडाक्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने, त्यांच्या जुन्या प्रकरणाला 'फोडणी' देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचे मानले जात आहे.

  आमदार महोदयांनी कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्यासाठीचा  लागणारा दंड तेव्हाच्या तेव्हाच भरून कायद्याचे पालन केले आहे. मात्र या घटनेला काही जण वेगळा रंग देण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलल्या जात आहे.
      मात्र आमदार आणि आपल्या विधानसभा क्षेत्रात सुरू केलेले विकासात्मक कार्य यावरून त्यांना मिळालेल्या यशावरून लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक 'फेक न्यूज' पसरवली जात आहे. अर्धवट आणि खोडसाळ बातम्यांवर विश्वास ठेवू नका. विकासकामे रोखता येत नसल्याने विरोधक आता चारित्र्यहननाचा मार्ग अवलंबत असून नेहमीच जनतेच्या हितासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी आग्रही असणारे आमदार देवतळे यांनी या घटनेतूनही आपली नैतिकता सिद्ध केली आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात जनतेने सावध राहावे असे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला  मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला 
आधुनिक केसरी न्यूज  महेश गायकवाड  सोलापूर : जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'नरबळी'चा संशय या प्रकरणात...
आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!
प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन 
गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त