Braking News : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव...

पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच : नाना पटोले 

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करु दिले नाही का?, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे.  

विधानसभा निवडणुक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपाच्या हाताखालचे कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : दि.११ धनुष्यबाण हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तुम्ही धनुष्यबाणाला मतदान केल्यास तो...
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका
व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या चंद्रपूरात
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा सरसावले; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकाच दिवशी तीन सभा..!
धरणे आंदोलनासाठी अधिकृत जागा द्या ! जालना येथील अशासकीय संस्थेच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी