मोठी बातमी : एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा

मोठी बातमी : एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली ?

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर  मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून केली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते. दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली?  एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत
आधुनिक केसरी न्यूज  शिर्डी : दि. ७ सप्टेंबर २०२६ श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी इंडिया...
भोकरला भूमाफीयांच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या मयताच्या आईने दिली तक्रार
धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बिलोलीत तहसीलवर धडक मोर्चा
जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..!
ओबीसी आंदोलकांचे उपोषण पोलिसांनी रोखले; वडीगोद्रीत तणाव
उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन
अधिवक्ता परिषदेतर्फे जामीन व अटकपूर्व जामिनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान