सुधीर मुनगंटीवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

 सुधीर मुनगंटीवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

आधुनिक केसरी न्यूज 

प्रा.शाम हेडाऊ 

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज दुपारी रांगेमध्ये लागून सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सौ. सपनाताई मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई,मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार - बिडवई, उपस्थित होते. 

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. त्यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, व भंडारा-गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या एकुण पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा आज पहिला टप्पा असून सध्या विदर्भात मतदान सुरु झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठा विकास झाला आहे. विकासाच्या बळावर जनता भाजप महायुतीसोबत आहे. निवडणुकीत भाजप रेकॉर्डब्रेक मताधिक्‍याने विजयी होईल. तसेच नरेंद्र मोदीच पुन्हा प्रधानमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्‍त केली. 

पाचही जागेवर भाजपा महायुतीचा विजय निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. मतदानाचं प्रमाण हे जास्तीत जास्त झाले पाहिजे. लोकसभा निवडणूक ही आमची परीक्षा आहे. यामध्ये नक्कीच आम्ही उत्तीर्ण होऊ. असं म्हणत पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागावर भाजप महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे...
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार