ऍक्सिस बँकेत चलनांचा तूटवटा... मूळ चलनांची झेरॉक्स कॉफी काढून सर्रास वापर....
आधुनिक केसरी न्यूज
कळवण - कळवण शहरातील एकमेव असणाऱ्या ऍक्सिस बँकेत साधारण तीन ते चार महिन्यापासून सर्वच प्रकारच्या चलनांचा तूटवटा भासत असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असून संभ्रम निर्माण होत आहे. शहरातील गणेशनगर भागात मेनरोडवरील ऍक्सिस बँकेची एकमेव शाखा असून सदर बँकेत करंट, सेव्हिंग,तसेंच इतर सर्वच प्रकारच्या चलनांचा मोठयाप्रमाणात तुटवटा असून यात मूळ चलनांची ( झेरॉक्स ) कॉफी काढून त्याचा सर्रास वापर होत असल्याचे निर्दर्शनास येत आहे.
कळवण तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्यातील छोटे मोठे व्यापारी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक तसेच बचतगटांच्या महिलांची सदर बँकेत मोठया प्रमाणात वर्दळ असते. यात बचतगटांच्या बऱ्याच महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना चलनांसंदर्भात काहीच माहिती नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण होतांना दिसत आहे. सदर ऍक्सिस बँकेत सात ते आठ कर्मचारी कार्यरत आहेत. झेरॉक्स करून ठेवलेल्या चलनांबाबत ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना मिळत असतात. " चलनांबाबत आम्हाला काहीच माहित नसून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे,, " वरिष्ठ स्तरावरून चलन येत नाही तर त्याला आम्ही काय करू, तुमचे झेरॉक्स असलेल्या चलनावर काम धकत आहे तेव्हढेच बघा,, असे उद्धट उत्तरे संबंधित कर्मचाऱ्यांकडून देण्यात येतात.त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होतांना दिसत आहे. तरी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँक व्यवस्थापकानी तात्काळ मूळ चलनांची व्यवस्था करावी अशी मागणी ग्राहक वर्गाकडून करण्यात येत आहे...
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List