शेतात बेकायदेशीर लागवड केलेला तब्बल 32 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडला; आरोपी पसार
आधुनिक केसरी न्यूज
धुळे : शेतात लाखो किमतीच्या गांजाची विक्री करण्यासाठी लागवड केलेला तब्बल 32 लाख रुपये किमतीचा 930 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सपोनि जयेश खलाणे सो. यांना गुप्त बातमीदारांमार्फत िमळालेल्या माहितीवरुन सदरील कारवाई करण्यात आली. मुडकोविहीर गावाच्या शिवारात विठ्ठल बारक्या पावरा याने गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड करून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाढविले होते. मिळालेल्या माहितीवरुन सपोनि जयेश खलाणे यांना पोलीस अधिक्षक धुळे यांची सदर ठिकाणी जाऊन कार्यवाही करण्याची परवानगी घेऊन तहसील कार्यालय शिरपुर येथील राजपत्रीत अधिकारी अधिकार बाळकृष्ण पेंढारकर, निवासी नायब तहसिलदार शिरपुर पंच वजनकाटा धारक, फोटोग्राफर, व पोलीस पथकासह बुडकीविहीर गावाच्या शिवारात पोहचले व आरोपी विठ्ठल बारक्या पावरा रा. बुडकीविहीर ता. शिरपर जि. धुळे हा कसत असलेल्या शेताचा शोध घेतला. यावेळी एका शेतात गांज्या या आमली पदार्थ वनस्पतीची लागवड केलेली दिसली. सदर ठिकाणी कारवाई करत असताना पोलीस आल्याची चाहुल लागताच शेती कसत असलेला आरोपी हा तेथून पसार झाला. सदर ठिकाणी कोणताही इसम मिळून न आल्याने तेथे पोलीस पाटील सुनिल शिवदास पावरा यांना बोलावून राजपत्रित अधिकारी व पंचासमक्ष सदर शेत कोण कसत आहे, बाबत विचारले असता सदर शेत विठ्ठल बारक्या पावरा रा. बुडकीविहीर ता. शिरपर जि. धुळे असे सांगीतले. पोलीस पाटील यांस सोबत घेवून तो कसत असलेल्या शेताची पाहणी करुन सदर शेतात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवून आणणारा गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केलेली दिसून आली. सदर क्षेत्रामध्ये सुमारे 5 ते 6 फुट कमी अधिक उंचीचे गांजाची झाडे लागवड केलेली दिसून आले. सदर शेतातील गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पती मुळासकट उपटून मोजमाफ केले असता एकुन 32,55,000/- रु. किमतीचे एकूण 930 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि जयेश खलाणे, संदीप पाटील, कृष्णा पाटील, मंगला पवार, चत्तरसिंग खसावद,आरिफ पठाण, शेखर बागुल,रोहीदास पावरा, राजेश्वर कुवर, जयेश मोरे, योगेश मोरे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा,मनोज पाटील यांनी केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List