खुंदलापूर परिसरात आढळला वाघोबाचा अधिवास; चांदोली मध्ये वाघोबाची डरकाळी

खुंदलापूर परिसरात आढळला वाघोबाचा अधिवास; चांदोली मध्ये वाघोबाची डरकाळी

आधुनिक केसरी न्यूज

सुधीर गोखले

सांगली : जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली अभयारण्यात वाघोबाची डरकाळी घुमली आहे. खुंदलापूर परिसरालगत असणाऱ्या मानवी वस्तीजवळ वाघोबाच्या पायांचे ठसे आढळल्याने वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील नागरी वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी वाघोबाच्या डरकाळ्या ऐकू आल्याने घबराटीचे वातावरण आहे. काही पर्यटनाच्या म्हणण्यानुसार खुंदलापूर ते जनीचा आंबा या रस्त्यावर वाघोबाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत या पर्यटकांनी या पावलांच्या खुणांचे ठसेही घेतले असून ते वन विभागाला दाखवण्यात आले आहेत. यापूर्वीही चांदोली अभयारण्यात वनविभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये वाघोबा कैद झाला होता आता त्याच्या आढळलेल्या पावलांच्या खुणांनी वागोबाच्या अधिवासावर शिक्कामोर्तबच झाले आहे. तर खुंदलापूर धनगर वाडा, शेवंताई मंदिर मणदूर धनगरवाडा, बिनोबाग्राम आणि सिध्देश्वरवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघोबाच्या चर्चांचे सत्र सुरु झाले आहे. मात्र खुंदलापूर नजीकच्या मानवी वस्तीमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. वन्यजीव संरक्षणासोबत मानवी जीवनही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे वनविभागाने याबाबत आता ठोस उपायोजना करण्याची गरज आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी चांदोली वनविभागाचे क्षेत्रपाल; हृषीकेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,'आमच्या विभागाला वाघांच्या येथील वावरासंदर्भात अद्यापही अधीकृत माहिती प्राप्त नाही. आमच्या कर्मचाऱ्यांना जिथे वाघांच्या पायांचे ठसे आढळले आहेत त्याठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले आहे. तसे या ठशांचे फोटो आमचं तज्ज्ञ टीम कडे विश्लेषणासाठी पाठवले आहेत. जरी वाघाचे अस्तित्व चांदोली परिसरात असले तरी मानवी वस्ती पर्यंत तो आला असल्याचे अजून कोणतेही पुरावे नाहीत मात्र नागरी वस्तीमध्ये सतर्कता बाळगावी'.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मराठी भाषा जपणं हे आपले धर्म कर्तव्य आहे : पानिपतकार विश्वास पाटील मराठी भाषा जपणं हे आपले धर्म कर्तव्य आहे : पानिपतकार विश्वास पाटील
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव  ठाणे : आपली आई आपल्या घरी जेव्हा आजारी पडते तेव्हा रस्त्यावर आपण रिक्शावाल्याला सांगत नाही...
खुंदलापूर परिसरात आढळला वाघोबाचा अधिवास; चांदोली मध्ये वाघोबाची डरकाळी
समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना
रात्रीच्या शांततेत रस्त्याचे कडेला सापडले निष्पाप स्त्री जातीचे नवजात अर्भक
सोलापुरात धक्कादायक : 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा ऑफिस मध्येच लैंगिक छळ, महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत!
शेतात राबणाऱ्या बाबासाहेब मनाळचा विहीरीत पडुन दुर्दैवी मृत्यू गंगापूर तालुक्यात शोककळा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?