सोलापुरात धक्कादायक : 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा ऑफिस मध्येच लैंगिक छळ, महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत!

सोलापुरात धक्कादायक : 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा ऑफिस मध्येच लैंगिक छळ, महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत!

आधुनिक केसरी न्यूज

महेश गायकवाड:

सोलापूर : साताऱ्यातील फलटणनंतर सोलापूर हादरवून टाकणारी गंभीर घटना समोर आली आहे, बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा कार्यालयातच शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे.याप्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील निम्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराला कंटाळून महिला आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलणार होती. मात्र सुदैवाने पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील निम्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीची दखल न घेता उलट पीडितेलाच 'अशा मुली चारित्र्यहीन असतात' अशी शेरेबाजी करणाऱ्या एचआरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी किश्त फायनान्स कंपनीचे सोलापूर ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या कार्यालयात एकूण 14 व्यक्ती कामाला असून केवळ एकच महिला कर्मचारी कामाला होती. तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. उलट पीडिता वॉशरूमचा वापर करायाला जाताना आरोपी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढायचे असा आरोप आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकारमुळे पीडित तरुणी ही प्रचंड मानसिक दबावाखाली येऊन आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. सुदैवाने पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेत पीडित तरुणीचे मानसिक समुपदेशन केल्याने अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 सोलापूरमधील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास तिने नकार दिल्यामुळे १० जणांनी तिचा छळ केला. या घटनेमुळे ती आत्महत्येच्या टोकावर पोहोचली होती, पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला.

याप्रकरणात कंपनीच्या सोलापूर ब्रँचमधील निम्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एकूण १० आरोपींवर, यामध्ये ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एचआरचा समावेश आहे. कार्यालयात एकूण १४ कर्मचारी असून, त्यापैकी फक्त एकच महिला कर्मचारी होती. कार्यालयातील इतर समस्या मध्ये पीडित महिलेसाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्था नव्हती. ती वॉशरूमला जाताना आरोपी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढत असत. हा छळ मागील अनेक महिन्यांपासून सुरू होता, ज्यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव आला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना
आधुनिक केसरी न्यूज सिदखेडराजा : दि. १ नोव्हेंबर साखरखेर्डा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गाच्या रिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात जागीच...
रात्रीच्या शांततेत रस्त्याचे कडेला सापडले निष्पाप स्त्री जातीचे नवजात अर्भक
सोलापुरात धक्कादायक : 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा ऑफिस मध्येच लैंगिक छळ, महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत!
शेतात राबणाऱ्या बाबासाहेब मनाळचा विहीरीत पडुन दुर्दैवी मृत्यू गंगापूर तालुक्यात शोककळा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?
पाचोरा भडगाव कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना युवा सेना निर्धार मेळाव्याचे आयोजन
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक