मराठवाड्यासाठी भूषणावह कामगिरी : CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे 'ए' ग्रेड मूल्यांकन

मराठवाड्यासाठी भूषणावह कामगिरी : CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे 'ए' ग्रेड मूल्यांकन

आधुनिक केसरी न्यूज

 छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी, पैठण रोड येथील CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली द्वारे  (NCISM, New Delhi) व भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली (QCI) संपूर्ण भारतातील मूल्यांकन झालेल्या सर्व आयुर्वेद महाविद्यालयातून CSMSS आयुर्वेद महाविद्यालय संपूर्ण भारतातून 'ए' ग्रेड प्राप्त झालेल्या यादीमध्ये प्रथम १० महाविद्यालयामध्ये १० वा क्रमांक मिळविलेला आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS, Nashik) संलग्नित मूल्यांकन झालेल्या आयुर्वेद महाविद्यालयातून महाराष्ट्रात २ रे मूल्यांकन मिळाले आहे.

भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘क्यूसीआय’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे हा आहे. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली यांच्या तपासणी पथकाने दिनांक १६ जुलै २०२५ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत महाविद्यालय व रुग्णालयास निरीक्षणाला आलेल्या तीन सदस्यीय टीमने महाविद्यालय व रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार, चाचण्यासह सर्व सोयी-सुविधांची माहिती घेतली. 
विद्यार्थ्यांच्या' शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास 'ए' ग्रेड दिला आहे. आयुर्वेद महाविद्यालयास यापूर्वी NAAC चे B++, ISO नऊ मानांकन तसेच रुग्णालय NABH मानांकन, ईट राईट प्रमाणपत्र, FSSAI प्रमाणित हॉस्पिटल किचन जागा, GMP प्रमाणित फार्मसीला प्राप्त झालेले आहे. QCI 'ए' ग्रेड मूल्यांकनामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, रुग्णांची सुरक्षा, संशोधन, संस्थात्मक व्यवस्थापन आणि सेवा वितरण यासारख्या निकषांवर उत्कृष्ट कामगिरीमुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या तपासणीत संस्थेने प्रत्येक निकषावर उत्कृष्ट निकाल दिले आहेत. आयुर्वेद  महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था सचिव श्री. पद्माकरराव मुळे यांनी दिली.

शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून ‘ QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकनामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख यांनी दिली. यावेळी संचालक तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, मानव संसाधन व्यवस्थापक श्री. अनिल तायडे पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील आणि कार्यालय अधीक्षक श्री. बाबासाहेब प्रधान आदी उपस्थित होते.

CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन मिळाले  आहे, ही आमच्यासाठी भूषणावह आणि मान उंचावणारी घटना आहे. या मानांकनामुळे अनेक फायदे होणार असून राज्यातील या नामांकित  महाविद्यालयास पूर्वीपासूनच NAAC चे B++, ISO नऊ मानांकन तसेच रुग्णालयास NABH चे मानांकन प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी निश्चितचं फायदा होईल. CSMSS  आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आमच्या अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक तसेच सचोटीने काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
                               
 - श्री. रणजीत मुळे,

अध्यक्ष, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि.११ विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी...
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक