समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना

समृद्धीच्या रिंगरोडला धडकून साखरखेर्ड़्याचे दोघे जागीच ठार दुसरबीड येथील समृद्धी महामार्गाजवळील घटना

आधुनिक केसरी न्यूज

सिदखेडराजा : दि. १ नोव्हेंबर साखरखेर्डा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गाच्या रिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ८ वाजता सातबारा हॉटेलसमोर घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेख आरिफ शेख कादर (वय ३६) आणि शेख अल्ताफ शेख अक्रम (वय २३, दोघे रा.साखरखेर्डा) हे दोघे एम.एच. २८ बी.जे. ४०२९ या एचएफ डिलक्स दुचाकीवरून साखरखेर्डा येथून दुसरबीड येथे एका रिसेप्शन कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडवरील दुभाजकाला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दोघेही जागीच ठार झाले. यातील शेख अल्ताफ हा अविवाहित आहे तर शेख आरिफ हा विवाहीत असून त्याला दोन अपत्ये असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलिस ठाण्याचे दुसरबीड बीटचे पोहेका शिवाजी बारगजे, डोईफोडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. आज सकाळी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
आधुनिक केसरी न्यूज बदनापूर : तालुक्यातील सायगाव शिवारात दुधना नदीपात्रातून काही लोकं जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन करत आहेत अशी...
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती
मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!
कार्तिक एकादशी...श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा, १ लाखांहूनअधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन