शेतात राबणाऱ्या बाबासाहेब मनाळचा विहीरीत पडुन दुर्दैवी मृत्यू गंगापूर तालुक्यात शोककळा
आधुनिक केसरी न्यूज
गंगापूर : तालुक्यातील वाहेगाव येथे दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब बंडु मनाळ (वय 36) हा आपल्या शेतातील दुपारच्या 2 च्या सुमारास गट क्रमांक 106 मध्ये विहरिच्या अवती भोवती तणनाशक औषध फवारणीचे काम करत असताना पाणी संपल्यामुळे विहीरीतून दोरीच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी गेला होता.त्या दरम्यान पाय घसरल्याने तोल जाऊन तो विहिरीत पडला पोहता येत नसल्या कारणाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घराजवळच शेत असल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. तत्काळ गावकरी घटनास्थळी धावले. जयदीप गायकवाड, दत्तात्रय मनाळ, कल्याण मनाळ आदी तरुणांनी तत्परतेने मदत करत स्थानिक रुग्णवाहिकेने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून बाबासाहेब मनाळ यांना मृत घोषित केले.या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. गावातील होतकरू तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



 
                  
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List