मराठी भाषा जपणं हे आपले धर्म कर्तव्य आहे : पानिपतकार विश्वास पाटील

मराठी भाषा जपणं हे आपले धर्म कर्तव्य आहे : पानिपतकार विश्वास पाटील

आधुनिक केसरी न्यूज

रत्नपाल जाधव 

ठाणे : आपली आई आपल्या घरी जेव्हा आजारी पडते तेव्हा रस्त्यावर आपण रिक्शावाल्याला सांगत नाही की माझी आई घरी आजारी आहे तिला दवाखान्यात घेउन जा ,औषध दे.आपल्या आईला सांभाळणं आपल काम आहे त्याच प्रमाणे मराठी भाषा ही प्रत्येकाने सांभाळली पाहिजे ,उराशी जपली पाहीजे असं मला वाटतं असे प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी ठाण्यात बोलताना केले. सातारा येथे होणार्या ९९ व्या अ.भा.मराठी साहित्य संम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणुन कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाल्याने ठाणे महानगर पालिकेच्या वतीने शनिवारी १ नोव्हे.रोजी  संध्याकाळी  नरेंद्र बल्लाळ सभागृहात  त्यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला होता त्यावेळी सत्काराल उत्तर देताना विश्वास पाटील बोलत होते.

विश्वास पाटील यांच्या नागरी सत्काराचे औचित्य साधुन प्राध्यापक अशोक बागवे यांनी लिहिलेल्या  निवडक ५० प्रस्तावनांचे संकलन असलेला *प्रस्तावणीय*हा ग्रंथ आणी कवी सतीश सोळांकूरकर यांच्या ललीतबंधावर दुर्गेश सोनार लिखित सोळा अंकुरांचे लालित्य या पुस्तकांचे प्रकाशन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .ही दोनही पुस्तके संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे यांनी प्रकाशित केली आहेत.

जिथे जिथे महाराष्ट्रात बाजाराची गाव आहेत ,आठवडे बाजार किंवा तालुक्याचे मोठे गाव आहे तिथे मराठी भवन बाधायला हवे .हे भवन कमर्शियल नको की ज्यामुळे गाळेवाल्यांना गाळे मिळतात,कमिशनवाल्यांना दलाली मिळते आणी मुळ संकल्पना बाजुला रहाते.मराठी भवनासाठी फार मोठ्या ईमारती बांधायची गरज नाही जिल्हा परिषदेच्या शाळा जशा उन पाउस वारा या पासुन रक्षण करणार्या  एक पाकी असतात  अशी एकपाकी ईमारत उभी करायला हवी.

असे कितीतरी लोक आहेत ज्यांची मुलं परदेशात आहेत त्यांना भारतात यायला वेळ नाही त्यांची म्हातारा म्हातारी ईथं आहेत त्यांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे .त्यांच्याकडे जमिन आहेत,भुखंड आहेत ते लोक द्यायला तयार आहेत अशा लोकांना गाठुन त्यांची मदत घ्या ,वीटा घ्या,दगड घ्या आणी महाराष्ट्रात किमान एका तालुक्यात दोन दोन तीन तीन तरी मराठी भवनं झाली पाहिजेत .याचा फायदा दुहेरी तिहेरी आहे .एक छोट़ ग्रंथालय तिथे तयार होईल ज्यांना आपल्या मराठी भाषेबद्दल ,आपल्या संस्कृतीबददल काही तरी करावंस वाटतं ते जेष्ठ या मराठी भवनात येतील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याचा आढावा घेतील,मराठी शाळेतील शिक्षकांच्या अडचणी समजुन घेतील.अशा प्रकारे मराठी भाषेकडे ,तिच्या व्यवहाराकडे आपले लक्ष राहील जगातील कोणतंही शासन भाषेच़ संवर्धन करु शकत नाही. हा लोकांचा उठाव आहे आणी तो लोकांनीच नेटाने पुढे न्यायला पाहिजे.,जरुर शासनाची मदत घ्या ,केली तर उत्तमच पण हे काम आपलं आहे म्हणून ते आपणच केलं पाहिजे असं मला वाटतं असं मत  विश्वास  पाटील यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .

एकही मराठी शाळा बंद होता कामा नये ,मी जेव्हा  सातवीला होतो ,त्यावेळी माझ्या वर्गात फक्त पाच विद्यार्थी होते .माझ्या गावची लोकसंख्या आजही १७०० आहे एव्हढ्या मोठ्या गावातुन मी आलेलो आहे .माझ्यावेळी पाच विद्यर्थी होते ती जर १० आणी १५ पटाची भाषा त्यावेळी जर लावली असती तर कदाचित आमच्या गावात शाळा राहिली नसती व मी ही शिकु शकलो नसतो .पिंजर्यातील पोपट आणी रानातील पोपट .रानातील पोपट म्हणजे नदिकाठचे ,जंगलातील पोपट ते उन,पाउस,चक्रीवादळ या सगळयामध्ये या पोपटांचे पंख फडफडतात कारण ते रानातले असतात आणी पिंजर्यातले असतात त्यांच्या पंखात एव्हढी धमक नसते या दृष्टीकोनातुन जिल्हा परिषद,म्युनिसिपालटी मधुन शिकुन आलेली मुलं अव्वल असतात त्यांचा गुणांक खुप मोठा असतो.
 तुम्ही हिशोब काढलात तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वरचे सगळे ९० टक्के मोठे संशोधक हे जिल्हा परिषदेच्या मराठी  शाळेत शिकलेले आहेत असे नमुद केले. विचार पीठावर प्रा.अशोक बागवे,सतीश सोळांकूरकर,अभिनेते सागर तळाशिकर ,गझलकार,व ठा.म.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी,,प्रा.प्रदिप ढवळ ,अभिनेते नारायण जाधव ,प्रकाशक नितिन हिरवे,कवी,पत्रकार दुर्गेश सोनार उपस्थीत होते .या सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली .सभागृहात अनेक मान्यवर साहित्यिक,कवी ,पत्रकार उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नवीमुंबई चे जनसंपर्क अधिकारी कवी साहित्यिक महेंद्र कोंडे यांनी  केले.

(ठाणे शहराचे भुषण असलेल्या कवी पी,सावळाराम (दादा) यांची आवर्जुन आठवण विश्वास पाटील यांनी काढली . महानायक हे माझ्या कादंबरीच नाव पी.सावळारामांनी सुचविल्याच त्यानी नमुद करुन आपली कृतज्ञता व्यक्त केली )

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
आधुनिक केसरी न्यूज बदनापूर : तालुक्यातील सायगाव शिवारात दुधना नदीपात्रातून काही लोकं जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन करत आहेत अशी...
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती
मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!
कार्तिक एकादशी...श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा, १ लाखांहूनअधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन