गोवंशाची अनधिकृत कत्तल करणाऱ्यांवर बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई

छाप्यात एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,गुन्हा दाखल.

आधुनिक केसरी न्यूज

बदनापूर : येथील कुरेशी मोहल्ल्यात काही लोक हे गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मास विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर ता.०१ नोव्हेंबर रोजी सकाळी तेथे अचानक छापा घालून त्या ठिकाणी शेखलाल कुरेशी वय ४६ वर्ष रा. कुरेशी मोहल्ला बदनापूर, आयाज करित कुरेशी वय २७ वर्ष रा. कुरेशी मोहल्ला बदनापूर,शफिक अब्बास कुरेशी वय ४५ वर्ष रा. कुरेशी मोहल्ला बदनापूर,शेख रफिक शेख छोटु वय: ५० वर्ष रा.कुरेशी मोहल्ला बदनापूर, हे सर्व आपल्या दुकानात जनावरांचे मांस ठेऊन त्याची विक्री करीत असताना आढळून आले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण ६२५ किलो वजनाचे गोवंश एक लाख पंचवीस हजार किमतीचे मांस आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी,उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे,स.पो.नि.श्रीमती स्नेहा करेवाड पो.उप.नि.संतोष कुकलारे,स.फौ.संतोष सावंत,  स.फौ.बाबासाहेब जऱ्हाड, पो.हे.कॉ.अंकुश दासर, 
पो.हे.कॉ.प्रताप जोनवाल, 
पो.हे.कॉ.रंजीत मोरे, 
पो.कॉ.पुनमसिंग गोलवाल, पो.कॉ.एस.जे.तडवी ,पो.कॉ.ढगे,पो.कॉ.इरफान शेख,पो.कॉ.रुपाली पवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार