ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी ठार तर पती व मावस देर जखमी धुळे -सोलापूर महामार्गांवरील वडीगोद्री -टी पॉईटजवळील घटना

ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी ठार तर पती व मावस देर जखमी धुळे -सोलापूर महामार्गांवरील वडीगोद्री -टी पॉईटजवळील घटना

 IMG-20230602-WA0349

आधुनिक केसरी न्यूज 

रामदास पटेकर 
अंबड : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नी ठार तर पती व मावस देर जखमी झाल्याची घटना धुळे -सोलापूर महामार्गांवरील अंबड तालुक्यातील वडीगोद्री टी पॉईट वरील उड्डाणपुला जवळ दि. 2 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आश्विनी अनिकेत कादगे वय 22 रा. रुई धानोरा ता. गेवराई ही नवविवाहित महिला जागीच ठार झाली. तर अनिकेत हनुमंत कादगे वय 28 रा. रुई धानोरा ता. गेवराई व प्रमोद नामदेव घाटे वय 22 हे दोघे जखमी झाले.

विदर्भातील देऊळगावराजा येथील 1 जून रोजी असणारे लग्न आवरून दि 2 जून रोजी सकाळी दुचाकी क्र. एमएच 23 बी जी 6521 दुचाकीने पती पत्नी व मावस देर रुई धानोरा येथे जात असतांना  छत्रपती संभाजीनगर कडून बीड कडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलर क्रमांक जी जे 36 एक्स 3333 ने धुळे -सोलापूर महामार्गांवर अंबड तालुक्यातील वडीगोद्री टी पॉईंट जवळ ट्रक ट्रेलरने दाम्पत्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत पत्नी ठार झाली तर पती व मावस देर हे दोघे जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी धाव घेत मदत केली. धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रक ला पकडून चालकाला पोलिसाच्या ताब्यात दिले.

या घटनेची माहिती कळताच महामार्ग 52 चे  मदतनीस व रुग्ण वाहिका यांनी येऊन  मयत महिलेच प्रेत शवविच्छेदनासाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले  आहे.घटनेनंतर गोंदी पोलिसांनी ट्रक ट्रेलर ताब्यात घेऊन शहागड चौकी येथे नेण्यात आला असून ट्रक ट्रेलर चालकासही ताब्यात घेण्यात आले आहे. वाहतूक पोलिस यांनी येऊन वाहतूक सुरळीत केली आहे.वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मयत आश्विनी कादगे यांचे शव विच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
आधुनिक केसरी न्यूज वसमत : काॅंग्रेसला धक्का बसला असुन काॅंग्रेसचे खंदे समर्थक , जिल्हा पातळीवर विविध पदे भुषवलेले  डॉ मारोती...
अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी ; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी..!
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?
अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!