ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!

ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!

आधुनिक केसरी न्यूज 

भोकर : तेलंगणातुन नांदेड कडे भरधाव वेगात जाणा-या ट्रकने भोकरकडे येत असलेल्या खासगी मॅजीक वाहनांची गुरुवारी (ता. १०) सायंकाळी  साडेसात वाजताच्या सुमारास समोरासमोर धडक दिल्याने मॅजीक मधील  सहा प्रवाशी जागीच ठार झाले असून दहाजण  जखमी झाले आहेत. काही  गंभीर जखमींना घटणास्थळावरून नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील ट्रक क्रमांक (एपी२९/टिए/८१२९)  भरधाव वेगाने नांदेड कडे जात असताना वाकद शिवारातील वळणावर नांदेड हून खासगी मॅजीक क्रमांक (एमएच २६/एके/०५४८) समोरासमोर जोराची धडक दिल्याने मॅजीक मधील प्रवाशी लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे, पांडुरंग लीगोंजी  वाघमारे (दोघे रा.शिनगांरवाडी ता. भोकर,हाल मुक्काम सईदनगर),शेख फेरोज. मॅजीक चालक,रा. सईदनगर,भोकर), बलवान पवार ( वय ४० रा. पोटातांडा ता.हिमायतनगर),अलमास अलीमोदिन सगर,रा. बिलाल नगर भोकर),शायद सौदागर रा.सईदनगर,भोकर )याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर जखमीत ट्रक चालक बासुमीया राजुमीया (रा.कागजनगर तेलंगणा,)शेख खलील शेख वहिद (वय ३१ रा. सईदनगर), सोमनाथ मारोती यळणे(वय ३० रा.जाभंळसावळी  ता.हदगाव) जखमी झाले असून शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..! ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!
आधुनिक केसरी न्यूज भोकर : तेलंगणातुन नांदेड कडे भरधाव वेगात जाणा-या ट्रकने भोकरकडे येत असलेल्या खासगी मॅजीक वाहनांची गुरुवारी (ता....
भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने सोळा सन साजरा; भावलाल किटे यांना मिळाला मान..!
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट
MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप