मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
On
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : दि.१० मराठा कुणबी, कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांचेअवलोकन व प्रमाणपत्रांसाठी आज जिल्ह्यात सर्व तालुक्यात मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पाचोड ता. पैठण येथील शिबिरास आ. विलास भुमरे यांनी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली.
आज जिल्ह्यात भावसिंगपुरा, चौका ता.छत्रपती संभाजीनगर, पाचोड, आडूळ ता. पैठण,आळंद ता.फुलंबी, खुलताबाद, नाचनवेल ता. कन्नड, भराडी ता. सिल्लोड, वाळूज ता. गंगापूर, शिऊर ता. वैजापूर येथे आज शिबिरे पार पडली. बैलपोळा असूनही आज शेतकऱ्यांनी व ग्रामिण भागातील लोकांनी शिबिरांमध्ये माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात लोक माहिती घेण्यासाठी येत होते. त्यापैकी अनेकांनी आपली जात प्रमाणपत्रासाठीची प्रकरणे दाखल केली.
भावसिंगपुरा, चौका ता.छत्रपती संभाजीनगर येथे- भावसिंगपुरा येथे १० लोकांनी भेटी दिल्या. ४ जणांनी अर्ज दाखल केले. चौका येथे ७० अर्ज दाखल झाले. परिपूर्ण अर्ज सहा होते.पाचोड, आडूळ ता. पैठण-७० लोकांनी भेटी दिल्या व ३० अर्ज दाखल झाले, त्यातील परिपूर्ण असलेले तीन अर्ज होते.आळंद ता.फुलंबी,३० लोकांनी भेटी दिल्या. भराडी,बोरगाव बाजार ता. सिल्लोड येथे ४० लोकांनी भेटी दिल्या व माहिती जाणून घेतली.गारज, शिऊर ता. वैजापूर येथे ३९ अर्ज दाखल झाले. ४४ लोकांनी भेटी दिल्या.
उद्या शुक्रवार दि.११ रोजी वरुड काझी, पिसादेवी ता.छत्रपती संभाजीनगर, आपेगाव, विहामांडवा ता.पैठण, बाबरा ता. फुलंब्री, वेरुळ ता. खुलताबाद, देवगाव रंगारी, चापानेर ता. कन्नड, सिल्लोड, पालोद, निल्लोड ता. सिल्लोड, सोयगाव,सावळदबारा ता. सोयगाव, आसेगाव, गाजगाव ता. गंगापूर, लोणी खु., जाणेफळ ता. वैजापूर. येथे शिबिरे आयोजीत करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये भेटी देऊन आपल्या जातप्रमाणपत्र व नोंदींची माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
००००
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
10 Sep 2026 18:39:33
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : दि.१० मराठा कुणबी, कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांचेअवलोकन व प्रमाणपत्रांसाठी आज जिल्ह्यात सर्व तालुक्यात...

Comment List