भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : भरधाव वेगात येणाऱ्या कारची संरक्षण भिंतीला धडक बसल्याने कारमधील तिघे जखमी झाले आहेत.सदरील अपघातात गूरूवारी ( ता. १०) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास महाराणा प्रतापसिंह चौकातील उड्डाणपूलावर घडली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातात जखमी झालेले ओमसाई गणेश पांचाळ (वय३३ रा.भोकर), सतीश बासया शिरपल्ले(वय३८रा.बेंबर ता.भोकर) गजानन भगवान गुंढलवार(रा.पाटनूर ता.मुदखेड) यांचा समावेश आहे.जखमी तिघेजण बलेनो कार (क्रमांक एम.एच.३८वाय/४७६६) नांदेडहुन भोकर शहरात येत होते.शहरातील वळण रस्त्यावर येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षण भिंतीला जोराची धडक दिल्याने कार पलटी होऊन चेंदामेंदा झाली .अपघातस्थळी जवळच राहणारे शिवसेनेचे शहरप्रमुख पांडुरंग वर्षवार आणि त्यांचे चिरंजीव गजानन,पवन आणि महेंद्र किनीकर यांनी कार मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून पोलीसांना माहिती दिली. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून प्राथमिक उपचार सुरू आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List