दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची शासनाकडून दखल; नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख निलंबित

दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची शासनाकडून दखल; नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख निलंबित

आधुनिक केसरी न्यूज 

बालाजी वैजळे 

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे मुख्यालय परभणी येथील जिल्हा रुग्णालय हे असणार असल्याचे आदेश लातूर येथील आरोग्य उपसंचालक डाॅ रेखा गायकवाड यांनी काढले आहेत. दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार व अकार्यक्षम पणाचा फटका डाॅ संगिता देशमुख यांना बसला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष गोपाळराव सुर्यवंशी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांची बदली लातूर येथे झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी डॉ संगिता देशमुख ह्या एक वर्षापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेतात नियमबाह्य कामे करण्याचा सपाटा लावला होता. तसेच कार्यालयीन कामकाज करतांना आर्थिक देवाणघेवाण या कारणावरुन त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात वादाचे खडके उडत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाज ठेपाळले होते.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या आर्थिक तसेच कार्यालयीन कामात विस्कळीत पणा आला होता. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस पाठवून कामात सुत्रता आणावी अशी स्पष्ट सुचना दिली होती. त्यांच्या काळात झालेल्या नियमबाह्य बदल्या, तसेच पदोन्नती, समायोजन यामध्ये नियमबाह्य कामे करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी वारंवार कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्या कामात सुधारणा होत नव्हती. नांदेड जिल्हा परिषदेस औषधी खरेदी करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या नियमबाह्य कामामुळे करोडो रुपयांचा निधी अखर्चित राहिला. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी डॉ संगिता देशमुख यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी गोपनीय आदेश काढून लातूर येथील आरोग्य उपसंचालक डाॅ रेखा गायकवाड यांना पत्र पाठवून डॉ संगिता देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विभाची-२०२६/प्र.क्र.४२/वि.चा. (ई-१६१८३९४) दिले होते. त्यामुळे आरोग्य उपसंचालक डाॅ रेखा गायकवाड यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी आदेश काढले आहेत.आदेशात म्हटले आहे की,  महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४च्या पोटनियम (१) (अ) मधील तरतुदीनुसार आपणास संदर्भीय आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आलेले आहे. पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील. तसेच संदर्भीय आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आपले मुख्यालय परभणी येथील जिल्हा रुग्णालय येथे राहील आणि उक्त कालावधीत सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असे नमुद केलेले आहे.

त्यानुषंगाने संदर्भीय आदेश या सोबत जोडण्यात येत आहेत.  तरी सदर आदेश प्राप्त झाल्याची दिनांकीत पोच पावती ३ प्रतीत तात्काळ या कार्यालयास सादर करावी. तसेच आपल्याकडील जिल्हा आरोग्य अधिकारी या पदाचा कार्यभार सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गोपाळराव सुर्यवंशी यांच्याकडे हस्तांतरीत करावा व आपणास दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी तात्काळ रुजु व्हावे असे म्हटले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषद नांदेड येथे प्राप्त होताच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात खळबळ माजली आहे. 

दै. आधुनिक केसरीचा दणका
नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता यांच्या नियमबाह्य व गैरव्यवहाराचा  कारभाराचा भांडाफोड केला होता. तसेच त्यांच्या अखर्चित निधी संदर्भात वृत प्रकाशित केले होते. दि. ७ एप्रिल रोजी त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची दखल घेऊन तात्काळ निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची शासनाकडून दखल; नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख निलंबित दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची शासनाकडून दखल; नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख निलंबित
आधुनिक केसरी न्यूज  बालाजी वैजळे  नांदेड : जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना निलंबित करण्यात आले...
सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक
नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण 
मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला 
आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!
प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी