सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक

एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा गोळीबार 

सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : शहरातील श्रीनगर येथे झालेल्या खुन प्रकरणांचा झडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीत तीन अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे. दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोळीबार करुन जेरबंद केले आहे. श्रीनगर येथे सकाळी ५ वाजून ३० मिनिटाला गुन्हेगार सोनू कल्याणकर यांच्यावर चार जणांनी खुनी हल्ला करुन ठार केले होते. सदरील खुनाची घटना समजताच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला होता. तसेच घटनास्थळी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी भेट देऊन पाहणी केली होती. सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करुन अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखा व भाग्यनगर व वजिराबाद पोलिसांनी सदर प्रकरणातील गुन्ह्यांची पाश्र्वभूमी लक्षात घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. वजिराबाद पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी रोहीत लोट यास ताब्यात घेतले. वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सदर प्रकरणांत तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील तीन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अवघ्या काही तासांतच या खुना प्रकरणांचा उलगडा करण्यात आला आहे. 
नांदेड येथील कारागृहात असलेल्या गोलू मंगनाळे यांनी सोनू कल्याणकर यांच्या खुनाची टिप दिली होती. गुन्हेगार सोनू कल्याणकर यांनी नवरात्र काळात एका मुलीची छेड काढली होती. त्या कारणावरून मयत सोनू कल्याणकर यांचा खुन करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

*सोनू कल्याणकर यांच्यावर यापुर्वी हल्ला
मयत सोनू कल्याणकर यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झाला होता. गुन्हेगारीच्या वादातून एकवेळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मात्र या गोळीबारातून ते बचावले होते. मात्र चाकु हल्ल्यात ठार झाला आहे. सोनू कल्याणकर यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

एका आरोपींवर गोळीबार
सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पाठलाग करावा लागला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोळीबार करुन एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जखमी आरोपीला वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील श्रीनगर येथे झालेल्या खुन प्रकरणांचा झडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक...
नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण 
मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला 
आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!
प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा