आरपीआय आंबेडकर पक्षाचे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
आधुनिक केसरी न्यूज
बुलढाणा : सविस्तर वृत्त असे की सरन्यायाधीश भूषण गवई यांचे न्यायालयीन कामकाज चालू असताना सहा ऑक्टोबर रोजी राकेश किशोर या वकिलांनी सीजीआय गवई यांच्यावर बूट फेकण्याचा हल्ला केला. सनातन का अपमान नही सही गा हिंदुस्तानचे नारे देत बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय पुरातत्व विभागाने भगवान विष्णूची मूर्ती पून्हास्थापित करावी करावी अशा मागणीची याचिका न्यायाला दाखल झाली होती.परंतु हा विषय पुरातत्व विभागाचे अधीन नसून गवई यांनी सांगितले. याचा मनात राग धरून सीजीआय गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.याच्या निषेधार्थ म्हणून आरपीआय आंबेडकर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये राकेश किशोर वकिलावर टेरेरेस्ट ऍक्ट नुसार देश दोहाचा खटला दाखल करून दाखल करून त्याला देशद्रोही घोषित करावे अशा मागणीची निवेदन किरण पाटील यांना देण्यात आले. पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, जिल्हा सचिव प्रफुल तायडे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पावरा, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया तथा जिल्हा कार्याध्यक्ष सागर सिरसाट, जिल्हा संघटक गौतम सरदार, खामगाव तालुका अध्यक्ष गोवर्धन गवई,मेहकर महिला तालुका अध्यक्ष रत्नमाला पांडमुख, लोणार महिला तालुका उपाध्यक्ष, लोणार तालुका सचिव माधव अवचार, शहादेव तायडे तसेच इतर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List