बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 

बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होत असतानाच आज जिल्ह्याच्या राजकारणात  एक मोठी घडामोड घडून आली आहे.
 शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि बँक संचालक रवींद्र शिंदे यांनी त्यांच्या काही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दमदार एन्ट्री करत एकूणच येथील राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करणारे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली  हा प्रवेश मुंबई येथे  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही जवळपास 13 वर्षानंतर पार पडली. यावर्षी प्रथमच या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांनी प्रचंड रस घेतला. काँग्रेसने गेले काही वर्ष या बँकेवर वर्चस्व गाजवले आहे, परंतु यावेळी भाजपने निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. परिणामी भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त संचालक निवडून आले. त्याच वेळी, काँग्रेसनेही हा गड वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु आजच्या मोठ्या अनपेक्षित अशा राजकीय घडामोडीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा केवळ वैयक्तिक निर्णय नाही, तर जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या छावणीत आणण्यासाठी एक निर्णायक दुवा मानला जात आहे. आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकेल हे जवळजवळ निश्चित झाले आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून एकूण राजकीय क्षेत्रात होत असलेला हा बदल केवळ बँकेच्या राजकारणातच नव्हे तर जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम करणारा ठरू शकतो. या घडामोडीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यावेळेस निश्चितच यश मिळालेले दिसत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी