अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा

अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा

आधुनिक केसरी न्यूज

भोकर : मतदारसंघात भाजपाचे खासदार अशोक चव्हाणचा राजकीय दबदबा कायम असुन याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. चव्हाणांच्या मूशीत वाढलेल्या पदाधिकाऱ्यांना  पक्षप्रवेश देवून पक्षवाढीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.मंगळवारी (ता.१५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बहुजन समाजाच नेते नागनाथ घिसेवाड हे अनेक  समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी "सकाळ" शी बोलताना दिली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असल्याने गल्ली ते दिल्ली पासूनच्या राजकीय नेत्याच ईकडे लक्ष लागून असत. मतदारसंघात टाचणी पडली तरी मोठा आवाज येतो हे विशेष होय.मागील तीन चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लवकरच होणार असल्याने  तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.स्थानिक पातळीवरील राजकीय क्षेत्रात "नाव " असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सोयीचं राजकारण करण्यासाठी स्वार्था सोबतच परमार्थ साधुन राजकीय जम बसवण्यासाठी कोलाटऊड्या घेताना दिसून येत आहेत.राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर  स्वबळाचा सूर उमटवला जातो आहे. अशोक चव्हाण व प्रताप पाटिल चिखलीकर हे महायुतीत एकत्र घटक असले तरी राजकीय वैर असल्याने फारसं जुळत नाही.पक्षवाढिच्या निमित्ताने मतदारसंघात राजकीय कूरघोडी सुरू आहे.काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड यांना भाजपात प्रवेश दिला जात असताना   तालुक्यातील बहूजन नेते नागनाथ घिसेवाड यांना  आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गळ घालून घिसेवाडसह नागोराव शेंडगे,बाजार समितीचे माजी संचालक अप्पाराव राठोड, चेअरमन , सरपंच असे बहुसंख्य कार्यकर्ते मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला जातो आहे.  श्री.घिसेवाड यांनी यापूर्वी विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत विरोधकांना सळोकीपळो करून सोडल होत.अनेक पक्षाची चव चाखुन ते आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दाखल होत आहेत. भोकर मतदारसंघातील घड्याळाची होणारी" गजर" कुणाच्या पथ्यावर पडेल या बाबत राजकीय चर्चा रंगु लागली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी