सुपा पोलिसांकडून घरफोडीच्या अट्टल गुन्हेगारांची बाजारपेठेतून धिंड
पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज
पारनेर : सुपा पोलिसांनी घरफोडीतील अट्टल गुन्हेगारांना बाजारपेठेतून धिंड काढून गुन्हेगारांवर जरब बसवण्याचा प्रयत्न केला आहे. पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि शिर्डी येथील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपी राजेश अशोक काळे (वय 24) आणि प्रदिप उर्फ खुटल्या अरकस काळे (वय 26), दोघेही रांजणगाव रोड, ता. पारनेर येथील रहिवासी, यांना सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अशोक मरकड, अमोल धामने, विकास गायकवाड, प्रशांत दिवटे, रमेश दरेकर आणि ठाणे अंमलदार खंडू लाळगे यांनी ही कारवाई केली.
सतिष झांबरे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली. तपासात त्यांनी पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि शिर्डी येथे अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि रोख रक्कम जप्त केली असून, विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सुपा बसस्थानक चौक, पारनेर रोड आणि सुपा ग्रामपंचायत चौकातून या गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली. या कारवाईचे सुपा परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे सुपा आणि आसपासच्या गावांमध्ये कामगार आणि नोकरदार वर्गाची संख्या वाढली आहे. यामुळे अनेक घरं बंद राहत असल्याने सराईत गुन्हेगार बंद बंगले आणि फ्लॅट्सना लक्ष्य करतात. सुपा पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या पावलाचे कौतुक करत धन्यवाद दिले आहेत. पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखाली अशोक मरकड पुढील तपास करत असून, सुपा पोलिसांचा हा उपक्रम परिसरात सुरक्षितता वाढवण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List