विधानसभा निवडणुकीवर नाना पटोलेंचे मोठे भाष्य....काँग्रेसच्या विजयासाठी....

विधानसभा निवडणुकीवर नाना पटोलेंचे मोठे भाष्य....काँग्रेसच्या विजयासाठी....

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई  : भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा व काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली व राज्यात महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक समाज, महिला, तरुणांचा कौल इंडिया आघाडीला मिळाला व आता राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना आहे, आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्यांची दखल देऊन त्यांना योग्य ती संधी दिली जाते, पक्षासाठी काम करा व विधानसभेवर काँग्रेसच्या विजयाची पताका फडकवा असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती ; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती ; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : दि. २९(जिमाका)-समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या टाकळीवाडी ता. गंगापूर येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती...
वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत
डीपीच्या शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
स्मशानभूमीच्या हक्कासाठी निपाणी सावरगावात सरणावर बसून आमरण उपोषण; आज सहावा दिवस, प्रशासनाची उदासीनता कायम
छत्रपती संभाजीनगरची इव्ही हब म्हणून जगात ओळख निर्माण करू : नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे
धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक
छत्रपती संभाजीनगरसाठी ‘विकासाचा रोडमॅप' ; सीएमआयए आणि सीएसएन फर्स्टने पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडल्या मागण्या