कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा घागर मोर्चा

कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा घागर मोर्चा

आधुनिक केसरी न्यूज

धोंडीबा मुंडे

कंधार : शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत तर महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कंधारच्या वतीने कंधार नगरपालिके वर घागर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी निषेध करत ॲड गंगाप्रसाद यन्नावार यांनी नगरपालिकेमध्ये प्रतिकात्मक आंघोळ करत नगरपालिकेचा निषेध केला.
       कंधार तालुक्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून एका बाजूस जगतुंग समुद्र व दुसऱ्या बाजूस मन्यानदी आहे,शहरासाठी पाणीपुरवठा करन्या करिता २६ कोटी रुपयांची लिंबोटी धरणातून कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी उपाय योजना करण्यात आली होती,
       ती अद्यापही अपूर्ण अपूर्ण आहे नगरपालिकेच्या गलथन कारभारामुळे व नियोजनाच्या अभावामुळे वारंवार पाणीपुरवठा हा विस्कळीत होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तर महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशा नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा आम्ही निषेध करत नगरपालिका प्रशासनास  दि,१४ जुन रोजी निवेदन देण्यात आले,
      या निवेदनात नगरपालिका प्रशासना ने तात्काळ कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या कंधार च्या वतीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घागर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले
     यावेळी ॲड गंगाप्रसाद यन्नावार, मधुकर पाटील डांगे,निलेश गौर सतीश कांबळे ॲड सागर डोंगरजकर,संतोष पदमवार,बालाजी दासू पवार,महंमद फारूक,अविनाश गित्ते,रामदास बाबळे, हनमंत डुमणे,चंदनफुले दत्तात्रय,शेखर वडजकर,रवी संगेवार,शुभम संगणवार,यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी