चंद्रकांत खैरे यांना सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी एक लाख रुपयांची मदत

माझी निवडणूक जनतेने हातात घेतली, हीच माझी शक्ती - शेतकरी नारायण सुरे यांच्याकडून धनादेश स्वीकारताना खैरे भावुक

चंद्रकांत खैरे यांना सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी एक लाख रुपयांची मदत

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरकरांची सेवा चंद्रकांत खैरे करत आहे. सत्तेत असो नसो खैरे मदतीला धावून जातात हा अनुभव अनेकांना आला. आता मात्र निवडणूक असल्याने महागाईच्या झळा सर्वांना बसत आहे. याची जाणीव झाल्याने छत्रपती संभाजीनगरात हर्सूल येथील सर्वसामान्य शेतकरी नारायण सुरे प्रचारासाठी चंद्रकांत खैरे यांना एक लाख रुपयांची मदत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सर्वच स्तरातून होईल तितकी मदत करत आहे. त्यामुळे माझी निवडणूक जनतेने हातात घेतली, हीच माझी शक्ती असल्याचे खैरे यांनी सांगितले. अडचणीच्या काळात सर्वसामान्य बळीराजाकडून धनादेश स्वीकारताना खैरे मात्र भावुक झाले. नारायण सुरे यांची हर्सूल परिसरात शेती असून, त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. हरसिद्धी माता मंदीरात सुशोभीकरण कामासाठी मदत केली होती.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. ९ सप्टेंबर २०२६ भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने...
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप 
मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार
नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर