रंगपंचमी विशेष कविता ! तुझ्या रंगात भिजावे...
On
आधुनिक केसरी
संजय जेवरीकर , पत्रकार
कितीही रंगलो तरी
रंगात भिजावे तुझ्या..
एकमेकांच्या साक्षीने
रंगून जावे तुझ्यात...
रंग प्रेमाचा गुलाबी
तुझ्या स्पर्शाने समजला..
पांढऱ्या शुभ्र आकाशी
जगण्याचा सुर गवसला..
लाल छटा सूर्याची
तुझ्या भाळी प्रगटली..
हिरव्या गालिच्यावरी
काया प्रसन्न दिधली...
रंगात रंगूनी माझा
रंग आहे वेगळा..
भासे कधी काळा
कधी वाटतो पिवळा...
इंद्रधनुच्या साक्षीने
रंगाची उधळण केली..
चिंब भिजवून तुलाही
तू नाही ओली झाली...!
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
25 May 2025 13:20:43
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली दि.२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या 'मन की बात' या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात गडचिरोली...
Comment List