शहरासाठी अजून ८५ तर भिंगार साठी ९ कोटींचा निधी मंजूर - आ. संग्राम जगताप
आधुनिक केसरी न्यूज
अहमदनगर : अहमदनगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनाने नव्याने 85 कोटी रुपयांचा तसेच भिंगार साठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीला मंजुरी दिल्यामुळे नगर शहरासह भिंगारचा आमदार जगताप यांच्या माध्यमातून कायापालट होण्यास मदत होईल. या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे नवीन उद्याने, क्रीडांगणे ,चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार आहेत. अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरघोस विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाची नव्याने पायाभरणी केली आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुरू आहे. आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही काळात वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून नगर शहरासाठी सर्वात मोठा निधी खेचून आणला आहे.
सध्या राज्याच्या तिजोरीची चावी अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे आमदार जगतापांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला आहे . नगर शहरातील डि पी रस्त्यासाठी नुकताच पहिल्या टप्प्यातील 150 कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्या पाठोपाठ आता नगर शहरासाठी 85 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नगर शहरात येत्या काळात 235 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लागणार आहे .आमदार जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही खरा करून दाखवला आहे. भिंगार साठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल नऊ कोटींचा निधी मिळाला आहे.
अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली त्यावेळी संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवार यांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला हा निर्णय नगरकरांसाठी लाभदायक ठरला आहे. यावेळी गणेश भोसले, संजय चोपडा, संपत बारस्कर, निखिल वारे ,प्रकाश भागानगरे , विनीत पाऊलबुद्धे अविनाश घुले, अजिंक्य बोरकर बाळासाहेब बारस्कर, मुजाहिद कुरेशी व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List