अभिमानास्पद : डॉ. निलेश राणे यांची अमेरिका व इंग्लंड देशांमध्ये विश्वविक्रमाची हॅट्रिक! वेब वर्ल्ड बुक या रेकॉर्ड बुक मध्ये नोंद
आधुनिक केसरी न्यूज
विलास कांबळे (देवांग)
येवला : डॉ.निलेश राणे यांची अमेरिका मधील वेब वर्ल्ड बुक या रेकॉर्ड बुक मध्ये त्यांच्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे, या आधी त्यांची इंग्लड मधील दोन वर्ल्ड बुक मध्ये सुद्धा नोंद झाली आहे. म्हणजेच परदेशात त्यांनी त्यांच्या विश्वविक्रमाची हॅट्रिक केली आहे.
डॉ. निलेश राणे त्यांचा हा विश्वविक्रम कमी वर्षात जास्तीत जास्त खेळाडूंना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देऊन हा रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावे केला आहे, म्हणजेच मागील 9 वर्षांपासून देशातील व राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा मोठा प्रमाणावर विकास व्हावा त्यासाठी ते प्रयत्न करत आहे, मोठ्या प्रमाणात ग्रामीण खेळाडूंना अचूक मार्गदर्शन करून त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास संधी उपलब्ध करून देणे तसेच त्या खेळाडूंसाठी ग्रामीण भागातच काही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून निस्वार्थी मदत करत आहे.
श्री.राणे यांना आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय, 15 राष्ट्रीय, 5 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे, त्यांच्या ह्या विश्वविक्रमाची हॅट्रिक होणे राज्यासाठी तसेच देशासाठी अभिमानाची बाब आहे, त्यांना क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List