संतापलेल्या जावयानं आपल्या सासूला दिली जीवघेणी शिक्षा
पत्नीला नांदायला न पाठवल्यानं संतापलेल्या जावयानं दळण करायचं जातं डोक्यात घालून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली आहे.

नांदेड, 07 जुलै: पत्नीला नांदायला न पाठवल्यानं संतापलेल्या जावयानं दळण करायचं जातं डोक्यात घालून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आरोपी जावयानं देखील गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. एकाच दिवशी सासू आणि जावयाच्या मृत्यूनं गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर याठिकाणी घडली आहे. आरोपी जावयानं 4 जुलै रोजी घरात कुणी नसताना आपल्या सासूच्या डोक्यात जातं घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. मालिनी बाहेकर असं हत्या झालेल्या 56 वर्षीय सासूबाईचं नाव आहे. तर श्रीकांत शंकरराव पाडदेवाड असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या जावयाचं नाव आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून सासूबाई पत्नीला नांदायला पाठवत नाही, हा राग मनात धरून त्यानं आपल्या सासूची हत्या केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List