रेकाॅर्डवरच्या खुन्याने दिला मित्रांकडे ठेवायला गांजा पण गुन्हेशाखेने मित्रांनाही ठोकल्या बेड्या,
फाॅरेन्सिक लॅबच्या उपस्थितीत कारवाई, २३कि.गांजा जप्त
आधुनिक केसरी न्यूज
औरंगाबाद - ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेकाॅर्डवरील खुन्याने आणलेला गांजा पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी दोन सख्या भावांना दिला.पण गुन्हेशाखेने दोन्ही भाऊ २३किलो गांजा( साडेचार लाख रु किमतीचा) १७ लाख रु.च्या कारसहित पकडला व पुढील कारवाईसाठी सिडको औद्योगिक पोलिसांच्या हवाली केला.
उमेर(२८) आणि अकबर(२६) इक्बालखान रा.यासिननगर हर्सूल या दोन्ही भावांकडे दिला.पण गुन्हेशाखेने दोन्ही भावांना ४.लाख ५४हजारांच्या गांजासहित बेड्या ठोकल्या वरील दोन्ही आरोपी सख्खे भाऊ आहेत, चिकलठाण्यात राहणारा रेकाॅडवरील खुनी सय्यद युनुस सय्यद मलिक रा.पुष्पा गार्डन चिकलठाणा. याला सहा वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती.तो आरोपींचा मित्र आहे.पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी सय्यद युनुस ने मित्रांना २२कि. ७०० ग्रॅम गांजा सांभाळण्यास दिला होता.तो गांजा घेऊन आरोपी स्वता:च्या स्कोडामधून घरी जात असतांना काल दुपारी २ वा. केंब्रीज शाळेसमोर गुन्हेशाखेच्या पथकाने पकडले. कारवाई करत असतांना फाॅरेन्सिक लॅब चे अधिकारी व व वजन काटा करणारे उपस्थित होते.यावेळी कारची झडती घेत गांजाचे वजन केले.त्यावेळी २२कि.६०० ग्रॅ. भरले.वरील कारवाई पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे, यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज शिंदे, काशिनाथ महांजोळ पोलिस कर्मचारी संतोष सोनवणे,चंद्रकांत गवळी, दत्तात्रेय गढेकर,भगवान शिलोटे, राजेंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला होता,
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List