वृक्ष आपले मित्र...!

वृक्ष आपले मित्र...!

आधुनिक केसरी 

झाडांशी माणसांचे नाते हे फार वेगवेगळ्या प्रकारचे असते.अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीचा गंध झाडांच्या रूपातून जपताना स्मृतिवने उभी केली आहेत. वृक्षांना आपले मित्र, नातेवाईक मानले आहेत. जर ही झाडे नसती तर माणसाचे जीवन अरूचिपूर्ण झाले असते. झाडे नसती तर हवा कशी हलणार? माणसांना प्राणवायू कसे मिळणार? झाडे नसती तर सावली कोण देणार? पोळणाऱ्या उन्हात क्षणभर जरी झाडाची सावली मिळाली तरी माणसाला हायसे वाटते. पाऊस कोसळू लागला की, माणसे झाडाखाली निवारा घेतात. केवळ माणसांनाच नाही तर पक्षी काही जनावरे यांचा झाडे हाच निवारा असतो. झाडे नष्ट झाली तर ती कोठे मुक्काम करतील? म्हणून निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने झाड लावलेच पाहिजे व ते वाचवलेच पाहिजे. 

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती."हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या संत तुकाराम महाराजांचे बोल आहेत. प्रत्येक मनुष्याला आपलं जीवन जगण्यासाठी वनस्पतीचीआवश्यकता असते. वनस्पती आपल्याला चवदार फळे, सुवासिक फुले, शीतल छाया आणि औषधी पदार्थ, जाळण्यासाठी लाकडे इत्यादी सारे काही देतात. सुगंधाची खैरात करतात. भारतीय संस्कृतीत वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. मानव आणि झाडे हे दोघेही निसर्गाचीच लेकरे आहेत. प्रत्येक मंगल कार्यात मानवाने वृक्षांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. आम्रवृक्षांची पाने घरात बांधतात तेव्हा मंगल कार्य संपन्न होते. शुभकार्यात आम्रपल्लवांशिवाय कधी चालायचे नाही. आंब्याच्या डहाळ्या नेहमी हव्या असतात. लग्न -मुंज असो आम्रवृक्षाचे हिरवे पल्लव हवेत. सृष्टीचा आशीर्वाद हवा. आम्रवृक्ष म्हणजे प्रेम व पावित्र्य, माधुर्य व मांगल्याचे प्रतीक असते. कारण पर्यावरण हे आरोग्याचे मंदिर आहे व ते सर्वांनी मिळून उभारायचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे उदात्त आणि महान आहे, त्या सर्वांचाच जन्म हा वनांमध्येच झाला. वृक्ष आणि मानवाचे पूर्वीपासून फार जिव्हाळ्याचे नाते आहे. सत्यवचनी ऋषी मुनींना वनांमध्येच शांत आणि सात्त्विक वातावरणात त्यांना ज्ञान प्राप्त झाले व त्यांची तपस्या ही फळास आली. भगवान गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखालीच ज्ञानाचा चमत्कार घडला म्हणूनच वृक्ष हे आम्हाला देवाप्रमाणे वाटतात.

झाडांशी माणसांचे नाते हे फार वेगवेगळ्या प्रकारचे असते.अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीचा गंध झाडांच्या रूपातून जपताना स्मृतिवने उभी केली आहेत. वृक्षांना आपले मित्र, नातेवाईक मानले आहेत. जर ही झाडे नसती तर माणसाचे जीवन अरूचिपूर्ण झाले असते. झाडे नसती तर हवा कशी हलणार? माणसांना प्राणवायू कसे मिळणार? झाडे नसती तर सावली कोण देणार? पोळणाऱ्या उन्हात क्षणभर जरी झाडाची सावली मिळाली तरी माणसाला हायसे वाटते. पाऊस कोसळू लागला की, माणसे झाडाखाली निवारा घेतात. केवळ माणसांनाच नाही तर पक्षी काही जनावरे यांचा झाडे हाच निवारा असतो. झाडे नष्ट झाली तर ती कोठे मुक्काम करतील? म्हणून निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने झाड लावलेच पाहिजे व ते वाचवलेच पाहिजे. कारण फक्त झाडे लावूनच चालणार नाही, तर झाडे वाचल्यानेच देशही वाचू शकेल. त्यासाठी अग्निपुराणात सांगितले आहे की, एक वृक्ष लावणे म्हणजे तीन हजार पितरांचा उद्धार करणे होय. म्हणून वृक्ष हे कल्पवृक्षाचे प्रतीक आहे. झाडांमुळे घरात प्रसन्नता, शीतलता व संपन्नता वाढते. उच्च प्रतीची संस्कृती असलेल्या भारतात वड, पिंपळ उंबर, बेल, आंबा इत्यादी वृक्षांची पूजा केली जाते. आजकाल भौतिक सुधारणांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगलतोड करायची. मोठमोठे डोंगर, टेकड्या भुईसपाट करून सपाटीकरण करायचे. हे म्हणजे परस्परविरोधी कृती करणे आहे. म्हणजे शेखचिल्लीसारखे ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडण्यासारखी परिस्थिती आहे.

पर्यावरण प्रदूषण म्हणजे एक भयानक शापच आणि त्यावरचा उतारा हा त्यावरील उ:शाप म्हणजे फक्त वृक्षारोपण! वृक्ष संवर्धन आहे. ज्यावेळी चिमण्यांची चिवचिव कोकीळ पक्ष्याचे कुहूकुहू आणि फुलपाखरांचा स्वच्छंदमुक्त विहार बंद होईल. ती वेळ म्हणजे मानवासाठी धोक्याची घंटा असेल. अर्थात परमेश्वराचंच दुसरं नाव म्हणजे निसर्ग.कारण निसर्गाने आपल्याला सृष्टिसौंदर्य दिले आहे. आपण निसर्गाला काय देणार? "करू संवर्धन पर्यावरणाचे, घडवू राष्ट्र समृद्धीचे, सुखाचे."मानवाला आवश्यक असणारा तीन सिलिंडरइतका प्राणवायू आपल्याला ही झाडे विनामोबदला देतात. तरीही आपण झाडांची कत्तल करावी? मानवाने हे अमानुष कृत्य कुठेतरी थांबविले पाहिजे. गणेशोत्सवासारख्या सामाजिक कार्यक्रमांतून वृक्षसंवर्धनाचा प्रचार व प्रसार करावा.शासनकर्ते, राजकारणी, गरीब - श्रीमंत, पुरुष - स्त्रिया या सर्वांनीच वृक्षाला आपल्या मुलाबाळांप्रमाणे जोपासावेत. कारण आंब्याची मधुरता,मिरचीचा तिखटपणा,काऱ्यांची कटुता, आवळ्यांचा तुरटपणा, चिंचेचा आंबटपणा, हे षडरस माणसाला कोठून समजणार? मोगऱ्याचा सुगंध,रातराणीचा मादक निशिगंध, चाफ्यांची तीव्रता तर गुलाबाचा मृदूगंध माणसाला कोठून अनुभवणार.

आपण वटवृक्षाची पिंपळाची मुंज लावतो. त्यांना पार बांधून देतो. आवळी भोजन करावे, वनात जेवावेत, झाडांच्या पानांवर जेवण्याची व्रते आहेत. देवाला तुळस हवी, बेल हवा, दुर्वा हव्यात, शमी हवी, देवाच्या पूजेच्या निमित्ताने रोज सकाळी अगोदर आपली फुलांशी भेट होते. तसेच दुर्वा - तुळस, बेलाशी भेट होते, असे स्नेहसंबंध भारतीय संस्कृतीने निर्माण केले आहेत. वृक्ष हे मुलांच्या नामकरणासाठी लागणाऱ्या पाळण्यापासून ते माणसांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सरणापर्यंत सदैव तत्पर असणाऱ्या सर्वात जिवलग मित्राला म्हणजेच वृक्षाला संपविण्याचा आम्ही जणू चंगच बांधला आहे. यासाठी विनोबाजी भावे म्हणतात. "निसर्गात प्रत्येक गोष्ट तिच्या आवश्यकतेच्या समप्रमाणात सुलभतेने उपलब्ध आहे. सर्वात प्राथमिक गरज हवेची असते. म्हणून नाक आहे तिथं हवा आहे. भस्मासुर हा ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म करणारा होता. सुवटी भस्मासुराने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवून तो स्वतः भस्म झाला आहे. माणसाचंही शेवटी असचं होणार का?" गवत हा जमिनीच्या संरक्षणाचा निसर्गाचा उपाय आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेने वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यासाठी खूप करण्याचे ठरविल्याने ते होणार नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज आहे.

 वक्षलागवडीच्या बाबतीत अहिल्याबाई होळकरांच्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी पंचवीस झाडे लावावी लागायची.आज शिक्षणसंस्थापासून वृक्षसंवर्धनाचे उपक्रम हाती घेण्यासारखे आहेत. एक मूल एक झाड" ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. प्रदूषणामुळे पाऊस पडत नाही. त्याचबरोबर मानवाला अनेक व्याधी जडल्या आहेत. डोळ्यांच्या, कानांच्या, फुफ्फुसाच्या, हृदयविकाराच्या, श्वसनाच्या व्याधी हे प्रदूषणामुळेच झाले आहे. म्हणून पुष्पवृक्ष, फलवृक्ष,छायावृक्ष या वृक्षांचा उद्देश एकच असतो. तो म्हणजे मानवाच्या जीवनात सुखाची हिरवळ निर्माण करणे. आयुर्वेदात तर वृक्षांना व फळांना अतिशय महत्त्व असून संपूर्ण आयुर्वेदाचा आधारच वृक्षवल्ली वनस्पती आहे. वृक्ष जिवंतपणी तर मानवाच्या उपयोगी पडतोच पण मृत झाल्यावरसुद्धा मानवावर अनंत उपकार करतो.

भारतातील ७१ सस्तन प्राणी ४४ प्रकारचे पक्षी २१ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि दोन हजार वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. झाडांचेच अस्तित्व नष्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळणे. भूस्खलन होणे यासारखे प्रकार घडत आहे. उदा. पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव भूस्खलनाचे बळी ठरले आहे. वड,पिंपळ कडूनिंब, चिंच, बेल, आंबा, कवठ व अशोक या वृक्षांचे दर्शन घेतल्याने आणि त्यांचे संगोपन केल्याने मनुष्याचा जन्म सार्थ होतो. सन २०३० सालापर्यंत हवेतील कार्बनडाय ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून मानवाचे संरक्षण करणारा ओझोन वायूचा थरसुद्धा वातावरणात निसटू पाहात आहे.

तसेच निसर्गात वटवाघळं हे वर्षभर झाडे लावण्याचे काम करीत असतात. रात्रभर एका झाडाच्या बिया दुसरीकडे टाकण्याचे काम अतिशय प्रमाणिकपणे वटवाघळं करीत असतात. आपण अनेक परदेशी झाडे लावून अन्नसाखळी नष्ट करण्याचे काम अतिशय वेगाने करीत आहोत. वटवाघळं मात्र स्थानिक देशी आणि बहुउपयोगी झाडे लावून निसर्ग समतोल ठेवण्याचे काम करतात. साधारणपणे ३५०पेक्षा जास्त जातीचे झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात. यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिंपळ, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळ झाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते. यात पाडाला पिकलेला आंबा सुरूवातीला वटवाघळेच खातात. तसेच मुंग्या अनेक कीटक अनेक प्रकारच्या बिया जमिनीखाली घेऊन जात असतात. बहुतेकदा पावसाळ्यात या बिया रुजतात आणि यांचे खूप मोठे वृक्ष तयार होतात. महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ या भागातील शंभर वर्षापूर्वीचे वने नष्ट झाली. डोंगर बोडके झाली. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण फार कमी झाले असून नापिकाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. तर वाढत्या तापमानामुळे मानवाला उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार जडत आहेत. वृक्षांच्या परोपकार या गुणामुळेच ते सर्वत्र पूजले जातात.त्यामुळे वृक्ष हे संतच आहेत. संत हे निःस्वार्थी असतात. आपल्या जवळील सर्व काही देण्यात त्यांना आनंदच होत असतो. परोपकार हे त्यांच्या जीवनाचे ध्येयच बनलेले असते. त्याचप्रमाणे वृक्ष हे आपल्याजवळील फळे, फुले, छाया सर्व काही देण्यात कुचराई करीत नाही. ज्याप्रमाणे संत परोपकारासाठी स्वतःला वाहून घेताना कष्ट सोसतात. तसेच वृक्षही आपल्या अंगाखांद्यावर वेगवेगळ्या पक्ष्यांना खेळवतात. संत हे कुठेही गेले तरी तेथे लोकांची मने निर्मळ करून तेथील वातावरण शुद्ध ठेवत असतात. त्याचप्रमाणे वृक्षदेखील हे आपल्या श्वासोच्छवासाद्वारे प्रदूषण थांबवून वातावरण स्वच्छ करीत असतात. त्यामुळे संतांप्रमाणेच वृक्ष हे एकाच जागी थांबून जमिनीची धूप थांबविण्याचे काम सतत करतात. जोरदार वादळे झाली तरी ते आपली जागा सोडत नाहीत. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण ते दुसन्यासाठीच घालवतात. म्हणून वृक्ष हे आपले जिवलग मित्र आहेत.

ayyub pathan

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान...
विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष
गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!
परतूर शहरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न आरोपी इस्पितळात तर आरोपी फरार 
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी