राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!

राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!

आधुनिक केसरी न्यूज 

सागर झनके 

जळगाव जा : गेल्या २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात घडलेल्या बनावट शिवानी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्य प्रदेशातील आदिवासी कुटुंबाचा अमानुष्य छळ केला. बनावट पुरावे रचून खून करणाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य केले. सत्य घटनेवर आधारित जय भीम चित्रपटाच्या कथा नका सारखेच पोलिसांनी ही कथा घडवलेला आहे. त्यामुळे या घटनेमुळे सहभागी पोलिसांवर सुद्धा कठोर कारवाई करायला पाहिजे. त्यांना पोलीस सेवेतून काढून टाकायला हवे ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ रोहित पवार यांनी व्यक्त केले. 


 जळगाव जामोद पोलीस स्टेशन हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात तील अवैध धंद्यांचा कॅरीडॉल बनले आहे. संपूर्ण राज्यात गुटखा ह्याच कॅरिडॉल मधून येतो, अफीम,, गांजा सुद्धा ह्याच पोलीस स्टेशन हद्दी मधून येते. नकली दारूची वाहतूक सुद्धा याच पोलीस स्टेशन हद्दीतून होते. देशी कट्टे सुद्धा ह्याच मार्गाने येतात आणि हे सर्व करणारे यांचा व्यापार करणारे दलाल आणि हस्तक यांच्याबरोबरच जळगाव जामोद पोलीस स्टेशन आणि पोलीस चे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा ह्या प्रकारात समावेश असून राजुरा परिसरात झालेले हत्याकांड हे पोलीस आशीर्वादाने झालेले आहे. ह्या खुणाच्या  मागे कुणीतरी मोठी राजकीय हस्ती आहे. ह्या प्रकरणांमध्ये लहान-सहान पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांचे निलंबन केले, परंतु अप्पर पोलीस अधीक्षक तसेच एलसीबी चे प्रमुख आणि जळगाव जामोद चे ठाणेदार या तिघांवर सुद्धा निलंबनाची कारवाई करून कठोर गुन्हे त्यांच्यावर दाखल करायला हवेत. असे ह्यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना सांगितले. ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मुलनिवासी ओरिजनल आदिवासी यांना खोट्या केसेस करून अडकवले आहे. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचा छळ केलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या मागणीसाठी सुद्धा आम्ही जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये दोन तास ठिय्या दिल्याचे सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितले. आदिवासी हे मूलनिवासी आहेत .आदिवासी हे या संस्कृतीचा आत्मा आहे." भारत जोडो" यात्रेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांचा ह्या सातपुड्याच्या कुशीत राजुरा परिसरात मुक्काम झाला होता. त्यावेळेस त्यांनी संबंध आदिवासी जमातीला "डरो मत" हा नारा दिला होता. ह्या परिसराचा राहुल गांधी यांना अभ्यास आहे. त्यामुळे या प्रकरणात येत्या सात दिवसात पोलिसांनी सर्व  दोशी पोलीस अधिकाऱ्यांवर  ॲट्रॉसिटी ॲक्टस अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नेत्यांना निमंत्रित करून एक आंदोलन उभारावे लागेल असा इशारा सुद्धा यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार यांनी दिला. 

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार बिझी व्यक्ती आहेत. त्यांचा व्याप मोठा आहे. देशात दररोज महिलांवर ,आदिवासींवर अन्याय होत आहे. दर एका तासाला एक महिला गहाळ होत आहे. गृह विभागाचे हे अपयश आहे. गृह खात्याला न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी ह्या खात्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहितदादा पवार यांनी केली. अजित दादा पवार मृत्यू प्रकरणातच पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. एका उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकरणात पोलीस काही करू शकत नाही तर  राजकीय दबावात असलेले हे पोलीस या राजुरा हत्याकांडात सुद्धा काहीही करू शकत नाहीत. कारण ते पूर्णतः राजकीय दबावात आहेत. लोकशाही मार्गाने आदिवासींना न्याय देण्यासाठी या घटनेमध्ये दोषी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांसह डीआयजी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडे केली असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे हेलिकॉप्टर द्वारे हेलिपॅड वर आगमन झाले त्यानंतर हेलिपॅड पासून पोलीस स्टेशन पर्यंत रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवली आणि पोलीस स्टेशन गाठले. मेहकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी संतोष खाडे, मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंदराव महाजन आणि जळगाव जामोद  ठाणेदार सचिन बागुल यांच्याशी उभयनेत्यांनी दीर्घ चर्चा केली. ह्या चर्चेदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधला. ह्यावेळी राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रसेंनजित  पाटील ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांची सुद्धा उपस्थिती होती. 


ॲट्रॉसिटी दाखल करा: संयुक्त तक्रार 
मध्य प्रदेशातील कळमेकर कुटुंबीय हे कोरकू जमातीचे आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी फार मोठा अन्याय केला आहे. त्यांना उलटे टांगून अमानुष मारहाण करून त्यांच्याकडून बडजबरीने गुन्हा कबूल करून घेतला आहे. त्यांना तब्बल २० ते २२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले. पोलिसांनी आदिवासी जमातीवर फार मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर अनुसूचित जमाती अन्याय कायदा नुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात यावा, असे संयुक्त तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पोलिसांना देण्यात आली आहे. येत्या सात दिवसात कार्यवाही झाली नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..! राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके  जळगाव जा : गेल्या २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात घडलेल्या बनावट शिवानी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी...
कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार : हर्षवर्धन सपकाळ
लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना 
शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना
मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 
गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू