लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

लोहा : शहरातील तहसील, पंचायत समिती, रजिस्ट्री व भूमी अभिलेख कार्यालयांच्या प्रशासकीय परिसरात सोमवारी (१ जून) पहाटे एका इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मारोती पुंडलीक बाचेवाड वय ( ४२), रा. निळा असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.प्रशासकीय कार्यालय परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी श्रीरामे यांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास लिंबाच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना माहिती दिली. त्यानंतर लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तलाठी भूमेश्वर विभुते, महसूल सेवक माधव काकडे तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत मृतदेह झाडावरून खाली उतरवून लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मारोती बाचेवाड यांना मृत घोषित केले. दरम्यान, मृताच्या खिशात सुसाईड नोट आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश 29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
आधुनिक केसरी केसरी  चंद्रपूर : दि.28 भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून...
भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस