अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन

अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड अधिकृतरीत्या घोषित केली.


    या निवडीमुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून लाखानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीर्घकाळ काम करताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी केलेले योगदान लक्षात घेता त्यांची विधान परिषदेसाठी झालेली निवड ही पक्षाच्या विश्वासाची पावती असल्याचे मानले जात आहे.
  आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, “अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर झालेली बिनविरोध निवड ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची पावती आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विकासासाठी निश्चितच होईल. विधान परिषदेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.” यावेळी आमदार जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून या तीनही जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!