परतूर शहरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न आरोपी इस्पितळात तर आरोपी फरार
आधुनिक केसरी न्यूज
परतूर : (वा.) शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून व्यापाऱ्यांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मंगळवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात भर बाजारपेठेत प्रतिष्ठित व्यापारी तथा होलानी ट्रेडर्सचे मालक श्री. पंकज होलानी व श्री. प्रवीण (बाळू) होलानी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज 'व्यापारी महासंघ, परतूर' च्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी आर.टी. रेंगे, उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड व पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत जाहीर निवेदन देण्यात आले. तसेच दुकानें बंद ठेऊन या निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांनी शहरातील खालावलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अत्यंत चिंता व्यक्त केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. ०२ जून रोजी रात्री ७:३० वाजता रेल्वे स्टेशन परिसरात पंकज होलानी व प्रवीण होलानी यांना अडवून अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. या भ्याड हल्ल्यात पंकज होलानी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हल्लेखोरांनी त्यांच्याकडील पैशांनी भरलेली बॅग चोरण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रयत्न फसला असला तरी या घटनेने व्यापारी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. यापूर्वीही गोकुळ स्वीट मार्ट येथे एका ग्राहकाने माल घेऊन पैसे देण्यास नकार देत व्यापाऱ्यावर थेट जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती, अशी आठवणही महासंघाने करून दिली आहे. व्यापारी हा शहराच्या आर्थिक विकासाचा मुख्य कणा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परतूर शहरात व्यापाऱ्यांना सातत्याने टार्गेट केले जात असल्याने संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी प्रशासनाची व पोलिसांची आहे, परंतु स्थानिक पोलीस प्रशासन यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
व्यापारी महासंघाच्या प्रमुख मागण्या -
१. होलानी बंधूंवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित गुन्हेगारांना कडकडात कडक शिक्षा मिळेल याची खात्री करावी.
३. शहरातील मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन परिसर व सर्व व्यापारी भागांमध्ये पोलिसांची नियमित गस्त (Patrolling) तात्काळ वाढवण्यात यावी.
४. व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठोस व प्रभावी उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबवाव्यात.
५. भविष्यात अशा प्रकारच्या हिंसक व त्रासदायक घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली जावीत.
या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेश मस्के, संस्थापक अध्यक्ष दिलीप होलानी, उपाध्यक्ष गौतम कोटेचा व अनिल वाशींबे, सचिव राजेभाऊ काडे, सहसचिव मूकेश केजरीवाल, कोषाध्यक्ष नरपत जांगीड, सहकोषाध्यक्ष जूबेर तांबोळी, कार्यध्यक्ष अमोल लाळे तसेच मार्गदर्शक शिवाजी मामा दरगड, राजेंद्र झवर, सुरेशजी मंत्री, रफिक भाई काचलिया, आनंद कोटेचा, आणि आश्वीन दायमा यांच्यासह समस्त व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच याप्रसंगी उबाठा जिल्हाप्रमुख महेश नळगे, नगराध्यक्षा प्रतिनिधी आकाश राक्षे, नगरसेवक राजेश खंडेलवाल, प्रकाश चव्हाण, अखिल काझी, राजेश भुजबळ, न. से. प्रतिनिधी सावता काळे, सोनूसेठ अग्रवाल, आबा कदम, व्यापारी दिपककुमार अग्रवाल, रामुसेठ लोया, नरपत जांगीड, नारायण मुंदडा, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे..!
काल घडलेल्या प्रकारामुळे रिलस्टार पीआय सुदाम भागवत हे नेहमी सोशल मिडियावर व्यस्त असतात, अनेक आरोपींसोबत त्यांचे फोटो व व्हिडीओ आहेत. त्यामुळे चोरावर त्यांचा वचक राहिलेला नाही अशी चर्चा शहरभर पसरलेली आहे. "व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे शटरऐवजी थेट रस्त्यावर करावेत, जेणे करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत किंवा घडल्यास चोरं पकडणे सोपे जाईल असे आवाहन पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी केले व या प्रकरणातील दोषी असलेले आरोपी हे एका आठवड्यात पकडले जातील असा असा शब्द दिला.
व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल: "आठवडा म्हणून तब्बल सहा महिने उलटून गेले, तरी माझ्या प्रकरणातील चोर अजूनही फरारच आहेत. आरोप पत्रातही अनेक चुका असल्याचे प्रसाद यांनी सांगितले मिरचीची पूड टाकून चोरांनी लुटले असताना डोळ्यावर बॅटरी मारली असल्याचे आरोप पत्रात लिहिले जे की खोटे व चुकीची माहिती असल्याचे सर्वांसमोर सांगून त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला यावेळी अनेक वेळा चकरा मारून आरोपी मोकाट फिरत असून अटक का करत नाहीत असा जाब विचारला असता पोलीस केवळ आश्वासनच देतात, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही..!"
प्रसाद पोरवाल
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List