शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु

शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु

आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्‍यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती ‘आशुलिपी’ असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्‍याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्‍याला ‘आशुतोष’ म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख ‘भगवान आशुतोष’ असा करतात.आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु


आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्‍यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती ‘आशुलिपी’ असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्‍याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्‍याला ‘आशुतोष’ म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख ‘भगवान आशुतोष’ असा करतात.
आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द बाण, वारा किंवा सूर्य यांच्यासाठी वापरला जातो. गुग्गुळाच्या झाडाला आयुर्वेदात आशुपत्री असे नाव आहे. वेगाने धावतो म्हणून घोड्याला अश्व म्हणतात. अश्वावर जो स्वार होतो तो अश्विन असतो आणि घोडेस्वारी करणारी महिला असेल तर ती अश्विनी असते. कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ नाटकात राजा दुष्यंत हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमातला साधू त्याला आज्ञा देतो, “आशु प्रतिसंहर सायकम्।” म्हणजे पटकन बाण परत घे.
एखाद्या औषधाचा परिणाम तत्काळ होत असेल तर त्यास आशुक्रिया म्हणतात. आशु असलेले असे अनेक शब्द आपल्याला साहित्यात दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त विद्यार्थ्यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट  संवाद...
सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक