अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..!
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : लगत गुरुवारी (ता १०)झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांना मिळताच गुरुवारी रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात जखमी व मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.झालेली घटणा दुःखत असून मयताच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आथिर्क मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.रुग्णालयातील जखमीच्या उपचारासाठी रूग्णांना आवश्यक असलेली औषधी कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे.
आमदार श्रीजया चव्हाण यांनी घटणेची माहिती घेऊन अत्यंत वेदनादायी घटना असुन जखमी व मयताच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचा बळ मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, उपविभागीय महसूल अधिकारी प्रवीण मंगशेट्टि, उपविभागीय पोलिस अधिकारी रामचंद्र भंडवार,पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, नगराध्यक्ष भगवान दंडवे, उपनगराध्यक्ष दिलीप सोनवडे, नगरसेवक अविनाश वाघमारे यांनी भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला आहे.
पतीपत्नी,सख्ये भाऊ मयत
अपघातात पांडुरंग वाघमारे व त्याची पत्नी लक्ष्मीबाई आणि बलराम पवार व कृष्णा पवार या संख्या भावाचा मृत्यू झाला आहे.लक्ष्मीबाई व कृष्णा आजारी असल्याने नांदेड येथे उपचारासाठी गेले होते पण वापस येताना काळाने घाला घातला.
मयतावर अंत्यसंस्कार अपघातात मयत झालेल्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता.११) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.सदरील घटणेमूळे शहरात हळहळ व्यक्त केले जात आहे.यावेळी प्रतिष्ठित नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List