खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 

खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्यातील खुन प्रकरणात व उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा प्रकरणातील आरोपीला भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परभणी येथे पकडले असून अटक करण्यात आली आहे.
भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल रोजी झालेल्या खून प्रकरणातील आरोपी सुरज सुनिल कदम हा गेल्या अनेक दिवसांपासून फरारा होता. सदरील आरोपी हा परभणी येथे असल्याची गुप्त माहिती भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व नरेश वाडेवाले यांनी सदरील माहिती वरिष्ठांना कळवून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन परभणी येथे पोहचले. आरोपी सुरज सुनिल कदम हा मानवत रेल्वे स्थानकावर असल्याचा सुगावा लागताच भाग्यनगर पोलिसांनी मानवत रेल्वे स्थानक येथे सापळा रचून आरोपी सुरज सुनिल कदम यास ताब्यात घेतले. सदरील आरोपीला भाग्यनगर पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांने उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२४ या वर्षात दरोड्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरोड्यांचा गुन्हा केला तेव्हापासून आरोपी सुरज सुनिल कदम हा फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचे सहकारी विशाल माळवे, विष्णुकांत मुंडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, राजीव घुले, पठाण, सुधाकर मलदोडे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले  खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्यातील खुन प्रकरणात व उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा प्रकरणातील आरोपीला भाग्यनगर पोलिसांच्या...
बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!
बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रक व स्कुटीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश
बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना