साई वृंदावन कॉलनीत आरोग्य शिबिर; घोडेले दांपत्याचा पुढाकार

साई वृंदावन कॉलनीत आरोग्य शिबिर; घोडेले दांपत्याचा पुढाकार

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर, दि.७: येथील पैठण रोड भागातील साई वृंदावन कॉलनीतील सांस्कृतिक सभागृहात मणके दुखी व सांधेदुखी विषयक आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.७ ) करण्यात आले. माजी महापौर नंदकुमार घोडेले व अनिताताई घोडेले यांच्या पुढाकाराने सदर शिबिर घेण्यात आले.  गुजरात मधील अहिवा डांग जिल्ह्यातील प्रख्यात वैद्य गुलाब आहिर  यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. अत्यंत जुनाट मणके दुखी व सांधे दुखी आजाराचे निष्णात तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. शिबिरात दिवसभरात १६० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी अरविंद पटेल, विश्वनाथराव तुपे पाटील, डॉ. संजय कवडे, सुभाष वैद्य, वसंतराव वाघ, एन टी डोंगरे, राजेंद्र कवडे, गटविकास अधिकारी शिरसाळकर, काशिनाथ दापके, प्रा सचिन नवथर, चेतन डोंगरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साई वृंदावन कॉलनीत आरोग्य शिबिर; घोडेले दांपत्याचा पुढाकार साई वृंदावन कॉलनीत आरोग्य शिबिर; घोडेले दांपत्याचा पुढाकार
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर, दि.७: येथील पैठण रोड भागातील साई वृंदावन कॉलनीतील सांस्कृतिक सभागृहात मणके दुखी व सांधेदुखी विषयक...
झोपेच्या डुलकीचा फटका; समृद्धी महामार्गावर स्कार्पिओची आयशरला धडक
भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत
लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाचा खून ;गोरेगाव तालुक्यातील बोरगाव झुडपी-जंगल शिवारातील घटना 
विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
पिंपरी शिवारातील शेततळ्यात चौदा वर्षीय साई घुनावत मृतावस्थेत आढळला; आई-वडिलांचा घातपाताचा आरोप खुलताबाद तालुक्यात खळबळ एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली