पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 

पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके 

पैठण : येथील गोदावरी नदीपात्रात,  दशक्रिया विधी घाट ते गणेश घाटा पर्यंत नदीचे पाणी ओसरल्यानंतर गाळातून सोन्या-चांदीच्या वस्तू सापडतात. अंत्यविधीवेळी मृत व्यक्तीसोबत अर्पण केलेले दागिने (सोने, चांदीची नाणी) पाण्यात विसर्जित केले जातात, जे गाळात अडकून राहते. नाथषष्ठीच्या निमित्ताने किंवा पाणी कमी झाल्यावर लोक हातात चाळण्या, टोपल्या घेऊन नदीच्या गाळात हे सोने शोधण्यासाठी दिवसभर कसरत करतात. अनेक महिला आणि पुरुष चाळण्या आणि टोपल्या घेऊन गोदावरीच्या पात्रात  सोनं शोधण्यासाठी सध्या मग्न आहेत. पैठणच्या नाथषष्ठीनिमित्ताने नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामुळं नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे.गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट आहे,  येथे दररोज दशक्रिया विधी पार पडतात. विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केले जाते. यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू गाळात सापडतात. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोने शोधतात. काहींना सापडते तर काहींची मेहनत वाया जाते.रोज येवढी संख्या नसते परंतु पाणी कमी झाले अण गोदापात्रात आस पासच्या गावातील मजुराची संख्या वाढली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. २० एप्रिल २०२६ महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम...
चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश
खासदारांचे विधान दुर्दैवी व निंदनीय : आ.करण देवतळे
पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!
नूतन विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला
नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली