जवखेडा येथील सरपंच कैलास पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
आधुनिक केसरी न्यूज
श्रीक्षेत्र राजूर : भोकरदन जवखेडा बुद्रुक येथील सरपंच तथा माजी सैनिक कैलास उत्तमराव पवार यांचे शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ४२ वर्षे इतके होते.सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जवखेडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ असा मोठा परिवार आहे.
पवार हे स्नान करायला जात असताना अचानक खाली कोसळले.डोक्याला जबर मार लागल्याने त्यातून रक्तस्राव वाहत होता.ग्रामस्थांनी उपचारासाठी तात्काळ भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात हलविले.परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कैलास पवार हे माजी सैनिक होते. देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जन्म गावी येऊन ग्रामसेवा करण्याचा निश्चय केला होता.या उद्देशानेच राजकीय क्षेत्रात पदार्पण करून पहिल्याच प्रयत्नात ते जवखेडा गावचे सरपंच झाले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत व्यसनमुक्ती गाव, वृक्षारोपण,ग्राम स्वच्छता अभियान
यासारखे उपक्रम राबविले.गावातील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.पवार यांच्या अकस्मात निधनाने जवखेडासह परिसरातील मित्र परिवार,नातेवाईकांना मोठा धक्का बसला.जड अंतकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List