डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..!

डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..!

आधुनिक केसरी न्यूज

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील डाऊच फाटा परिसरात सोमवारी ८ डिसेंबर रोजी रात्री भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिलीप रंभाजी वाके (वय ४१, रा. पोहेगाव) हे आपल्या दोन कामगारांसह रस्त्याच्या कडेला पिकअप वाहनाच्या तुटलेल्या ऍक्सलची दुरुस्ती करत होते. त्याचवेळी विटांनी भरलेला व भरधाव वेगाने जाणारा डंपर ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटून थेट या तिघांवर आदळला.या जोरदार धडकेत दिलीप वाके यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबतचे इतर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी कोपरगाव येथील एस जे एस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर वाके यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या अपघातानंतर डंपर चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली के.ए. जाधव हे करत आहेत. अपघातस्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान दिलीप वाके हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पोहेगाव व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..! डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..!
आधुनिक केसरी न्यूज कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील डाऊच फाटा परिसरात सोमवारी ८ डिसेंबर रोजी रात्री भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभे...
संजय चव्हाण यांच्यावर अखेर कारवाई : जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जारी केला निलंबन आदेश
पोटात 28 सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेने दिले रुग्णाला नवे जीवन
पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले, संविधान विरोधी सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
जळगाव जामोदच्या बस स्थानकामधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता..!