पोटात 28 सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेने दिले रुग्णाला नवे जीवन

निदानानंतर नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पोटात 28 सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेने दिले रुग्णाला नवे जीवन

आधुनिक केसरी न्यूज

नांदेड : शहरातील प्रसिद्ध तोटावार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या लिंगामणी उन्ग्रतवार (वय 55) या रुग्णेच्या पोटात तब्बल 28 सेंटीमीटरची प्रचंड गाठ असल्याचे समोर येताच नातेवाईकांचा थरकाप उडाला. सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन अहवालात ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नातेवाईक रडत-ओक्साबोक्सी करत रुग्णालयात दाखल झाले. रुग्णाचे पोट अक्षरशः सात महिन्यांच्या गर्भवती महिलेप्रमाणे फुगलेले दिसत होते.

रुग्णेची तातडीने तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आशा तोडकर यांच्या केबिनमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉ. तोडकर यांनी ही गाठ जरी प्रचंड आकाराची असली तरी ती कॅन्सरचीच असेल असे नाही, अशी समजावणी दिली. मात्र अहवालातील भितीदायक शक्यता पाहून रुग्ण आणि नातेवाईक कोणतीही आशा धरायला तयार नव्हते.

त्यातच रुग्णेचे यापूर्वी दोन सिझेरियन ऑपरेशन्स आणि एक कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची ठरणार होती. पोटातील जखमा आणि पूर्वीच्या टाके यांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रक्रिया करताना मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे डॉ. तोडकर यांना जाणवत होते.

तरीही वैद्यकीय टीमने संपूर्ण तयारी करून शस्त्रक्रिया सुरू केली. सुमारे दोन तास चाललेल्या या जटिल शस्त्रक्रियेत डॉ. तोडकर यांनी कुशलतेने ही 28 सेंटीमीटरची विशाल गाठ शस्त्रक्रियेदरम्यान न फुटता पूर्णपणे बाहेर काढली. रुग्णेचा जीव वाचवल्यानंतर शस्त्रक्रिया कक्षाबाहेर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी डॉ. तोडकर यांच्या धैर्याचे आणि कुशल वैद्यकीय कौशल्याचे कौतुक केले.

नंतर ही गाठ पुढील परीक्षणासाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार ही गाठ १०० टक्के सामान्य असल्याचे आणि कॅन्सरचा कोणताही संकेत नसल्याचे स्पष्ट झाले. हा सुखद अहवाल मिळताच डॉ. तोडकर यांनी रुग्ण व नातेवाईकांना ही आनंदवार्ता दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा व आनंदाचा उजेड परतला.

डॉ. आशा तोडकर यांनी दाखविलेला शांतपणा, वेगवान निर्णयक्षमता आणि प्रवीण शल्यकौशल्यामुळे एका महिलेला नवे जीवन मिळाले आहे. या उल्लेखनीय कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत असून रुग्णालय प्रशासनाकडूनही या यशस्वी शस्त्रक्रियेचे कौतुक व्यक्त केले जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोटात 28 सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेने दिले रुग्णाला नवे जीवन पोटात 28 सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेने दिले रुग्णाला नवे जीवन
आधुनिक केसरी न्यूज नांदेड : शहरातील प्रसिद्ध तोटावार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या लिंगामणी उन्ग्रतवार (वय 55) या रुग्णेच्या पोटात तब्बल...
पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले, संविधान विरोधी सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
जळगाव जामोदच्या बस स्थानकामधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता..!
शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या