सरकारी नोकरीच्या अमिषाने दहा लाखाचा गंडा
तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासाच्या आधारे कुर्ला पश्चिम, मुंबई येथून आरोपीस अटक
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
सरकारी नोकरीं लावतो असे सांगून माळशिरस येथील जयवंत घाडगे यांची दहा लाख रुपयांची फसवणूक करून गेली पाच महिने फरार असलेल्या आरोपीस तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासाच्या आधारे कुर्ला पश्चिम, मुबंई येथून म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि. अक्षय सोनवणे आणि त्यांच्या स्टाफ ने शिताफिने अटक केली.
पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नामे जयवंत राजाराम घाडगे, राहणार माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिनांक 22/8/2025 रोजी त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी जोतीराम बालमुकुंद काटकर, राहणार वडजल याने 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्याच्या एक वर्ष अगोदर पासून सदर आरोपीने तक्रारदार यांच्याकडून शासकीय नोकरी लावतो असे सांगून व स्वतः आरोपी हे मंत्रालयामध्ये कामाला आहेत असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केलेली होती. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आरोपी अटकेची कार्यवाही चालू असताना सदरचा आरोपी पाच महिन्यांपासून फरार होता व त्याच्या ठाव ठिकाणाबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. परंतु पाच महिने सखोल तपास करून तांत्रिक विश्लेषण करून व या आरोपीच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे चौकशी करून व सखोल तपासाच्या आधारे हा आरोपी कुर्ला पश्चिम, मुंबई येथे गुन्हा करून लपून बसला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपास पथक तयार करून या आरोपीस कुर्ला पश्चिम, मुंबई येथून शिताफीने अटक केली आहे. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून या आरोपीस आज रोजी अटक करून माननीय न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड करीता हजर केले असता माननीय म्हसवड न्यायालयाने या आरोपीची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. आरोपीचे संपूर्ण नाव जोतीराम बालमुकुंद काटकर, वय 41 वर्ष, मूळ राहणार वडजल, तालुका माण, जिल्हा सातारा, सध्या मुंबई.
सदरची कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार देवानंद खाडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी केलेली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List