वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी देवानंद दामोदर
आधुनिक केसरी न्यूज
जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी देवानंद दामोदर यांची नियुक्ती झाली असून, तसे नियुक्तीपत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी १८नोव्हेंबर २०२५ रोजी दिले आहे. त्याचबरोबर जळगाव जामोद तालुक्याची नवी कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली आहे .पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान तालुका अध्यक्ष रमेश नाईक व तालुक्यातील तीन पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकल्यामुळे वंचित बहुजन आघाडीची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणी मध्ये देवानंद दामोदर यांची तालुकाध्यक्षपदी तर उपाध्यक्ष विजय सातव, निलेश वानखडे, अस्मत खान मुल्ला खान, भीमराव हेलोडे, संतोष तिजारे, महासचिव संदीप उगले व सुनील बोदळे, सल्लागार रतन नाईक, संघटक प्रशांत अवसरमोल ,कैलास भगत, संतोष भारसाकडे ,सुनील तायडे, सहसंघटक उमेश डोंगरदिवे, सचिव श्रीकृष्ण गवई प्रसिद्धी प्रमुख योगेश वाकोडे ,कोषाध्यक्ष विजय तायडे, सहसचिव किशोर वले, सदस्य हरिभाऊ वाघमारे ,आनंदा गवई,अर्जुन अजणे, राजू वानखडे, अमोल पवार, प्रदीप मोरखडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List