लाडसावंगी बाजारपेठेला येणार चांगले दिवस : हरिभाऊ बागडे
आधुनिक केसरी न्यूज
लाडसावंगी : छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने लाडसावंगीत उप बाजार पेठ सुरू केल्याने या गावातील बाजारपेठे व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने शहरात जाऊन शेती माल विकण्याचे दिवस संपणार आहे असे प्रतिपादन राजस्थान चे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी लाडसावंगी येथे केले. लाडसावंगी चौका महामार्गावर गवळीमाथा शिवारात छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भव्य उपबाजारपेठ पेट्रोल पंप भुसार धान्य भाजीपाला फळे खरेदी लवकरच सुरू होणार असल्याने लाडसावंगी बाजारपेठ गजबजणार आहे शिवाय लाडसावंगी चौका व करमाड लाडसावंगी हे दोन प्रमुख रस्त्यावर सिमेंट कॉक्रेटीकरण करण्यात येत असल्याने दळणवळण व्यवस्था वाढणार आहे.रस्त्यामुळे शेतीच्या किंमती वाढवणार आहे त्या न विकता शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळ्या व्यवसायात उतरा असे आवाहन ही बागडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतिने प्रगतील शेतकरी व्यापारी व काही मोठ्या फळबाग धारक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.वेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , आ.अनुराधाताई चव्हाण, उप निबंधक समृत जाधव, उपसभापती मुरलीधर चौधरी, भागाचंद ठोंबरे, गणेश दहिहंडे, राम शेळके, सुजाता गायके.जनाबाई ठोंबरे, भागीनाथ नवपुते, पुनमचंद बमणे, कैलास उकर्डे, दत्तात्रय प उकर्डे, अभिजीत देशमुख, महेंद्र खोतकर, जगन्नाथ काळे, दामोदर नवपूते, सचिव व्ही.ए.शिरसाठ आदीची उपस्थिती होती. लाडसावंगी उपबाजार आवारात पेट्रोल पंप, फ्रुट बाजार पेठ भाजीपाला खरेदी केंद्र, भरड धान्य खरेदी केंद्र या सह विविध व्यवसाय सुरू करण्यात येईल तर आपल्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगर, येथील बाजार समिती,करमाड,प्रिप्रीराजा येथील बाजार पेठेचा झपाट्याने झालेल्या विकास कामांची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. दिली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List